जाहिरात

Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! आयटीनगरी हिंजवडी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी

त्याला पर्याय म्हणून पुण्यात मेट्रो आली. मेट्रोचे एक एक टप्पे आता पूर्ण होत आहे.

Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! आयटीनगरी हिंजवडी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी
पुणे:

पुण्यातील आयटी अभियंते आणि हिंजवडी माण मधील ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित असणाऱ्या हिंजवडी माण ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पार पडलेली आहे. फेज तीन मधील माण गावापासून ते पहिल्या चार स्टेशनपर्यंत ही चाचणी आज पार पडली आहे. या मेट्रोचे अंदाजे पाच किलोमीटर टप्यापर्यंत ही चाचणी झाली. 23 किलोमीटरच्या या मार्गावर इथून पुढं रोज अशी चाचणी घेतली जाईल. मेट्रोचा हा मार्ग सुरू झाल्यानंतर पुणेकरांना मोठा दिलास मिळणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंजवडी माण ते शिवाजीनगर मेट्रोची  प्रत्यक्षात प्रवासाला मात्र 2026 पर्यंतची वाट पहावी लागणार आहे. त्यावेळी आयटी अभियंते आणि हिंजवडी माण मधील ग्रामस्थांना याच मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल. पुण्यामध्ये मेट्रो आल्याने वाहतूकीची समस्या दुर झाली आहे. तसं पाहिल्यास पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. वाढणारी लोकसंख्या, त्याच बरोबर वाढलेली वाहने याला कारणीभूत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण येतो. 

 ट्रेंडिंग बातमी - Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमिन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?

त्याला पर्याय म्हणून पुण्यात मेट्रो आली. मेट्रोचे एक एक टप्पे आता पूर्ण होत आहे. ही मेट्रो पुर्ण पणे कार्यान्वीत झाल्यानंतर त्याचा थेट फायदा पुणेकरांना होणार आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थे वरचा ताण ही कमी होणार आहे. पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार  पुण्यामध्ये एकूण 40 लाख 42 हजार 659 इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: गुढ हत्या! भुलेश्वर घाटात आढळला अर्धवट जळलेला मृतदेह

कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग, नो होल्टिंग झोन करणे, सिग्नल व्यवस्था अद्ययावत करण्यात येत असून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत स्मार्ट सिग्नल, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यात येत आहे. पुणे शहराची 2054  पर्यंत होणारी वाढ लक्षात घेऊन वाहतुक सुरळीत व सक्षम करण्यासाठी  रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com