पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) 'माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक' (आचार्य आनंदऋषीजी चौक) दरम्यानच्या 19 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. या यशामुळे हिंजवडी-शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्ग-3 मधील मोठा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा: Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3?
मार्चमध्ये पुणे Metro 3 मार्ग सुरू होण्याची शक्यता
हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक मार्ग आहे. हा टप्पा एकूण 23 किलोमीटर लांबीचा असून पुण्याचा बाह्य भाग आणि मुख्य पुणे यांना जोडणारा प्रमुख मेट्रो मार्ग आहे. या मार्गाच्या कामाला नोव्हेंबर 2021 साली सुरूवात झाली होती. या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. 23 किलोमीटर पैकी 19 किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. 23 किलोमीटरमधल्या 5 किलोमीटरच्या टप्प्याचे काम आता बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू करण्याचे पीएमआरडीएचे नियोजन आहे.
या मार्गावरील स्टेशन्स खालीलप्रमाणे असतील
- मेगापॉलिस सर्कल
- एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क
- डोहलेर
- इन्फोसिस फेज 2
- विप्रो फेज 2
- पाल इंडिया
- शिवाजी चौक
- हिंजवडी
- वाकड चौक
- बालेवाडी स्टेडियम
- एनआयसीएमएआर
- राम नगर
- लक्ष्मी नगर
- बालेवाडी फाटा
- बाणेर गाव
- बाणेर
- कृषी अनुसंधान
- सकाळ नगर
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- आरबीआय
- ॲग्रिकल्चर कॉलेज
- शिवाजीनगर
- सिव्हिल कोर्ट
पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी असते
- वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते.
- हिंजवडीला पुण्याच्या मध्यवर्ती भागी असलेल्या शिवाजीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टीव्हिने जोडण्याचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) निर्णय घेतला होता
- हा मार्ग एकूण 23 किलोमीटर लांबीचा असून यावर 23 स्थानके आहेत
- सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणारा हा पहिला देशातील पहिला प्रकल्प
- या मेट्रो प्रकल्पाचा खर्च ₹ 8313 कोटी असल्याची माहिती देण्यात आली आहे
- मेट्रोमुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल, अपघातांना आळा बसेल, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा
- 8 डिसेंबर 2018 रोजी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले