जाहिरात

Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती

Pune News : पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो लाईन 3 (हिंजवडी-शिवाजीनगर कॉरिडॉर) आता बाणेरपर्यंत विस्तारित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती
Pune Metro: पुणे शहरातील वाहतूककोंडीतून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांचा यामुळे जलद प्रवास होणार आहे.
पुणे:

Pune News : पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो लाईन 3 (हिंजवडी-शिवाजीनगर कॉरिडॉर) आता बाणेरपर्यंत विस्तारित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूककोंडीतून प्रवास करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा आणि सामान्य नागरिकांचा प्रवास अतिशय सुखकर होणार आहे.

वेळेची बचत, वाहतूककोंडीला 'रामराम'!

पुण्यातील आयटी हब (IT Hub) आणि मध्य शहर (City Center) यांना जोडणाऱ्या 'हिंजवडी-शिवाजीनगर-विठ्ठलवाडी' मेट्रो कॉरिडॉरच्या प्रवाशांसाठी या मार्गाचा फायदा होणार आहे.  हा महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग आता बाणेरपर्यंत (Baner) विस्तारित होणार आहे. 

23 किलोमीटर (Km) लांबीचा हा उन्नत (Elevated) मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (Public-Private Partnership - PPP) तयार होत आहे. मेट्रो 3 चा बाणेरपर्यंतचा हा विस्तार आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी थेट जीवनवाहिनी ठरणार आहे.

( नक्की वाचा : Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण )
 

मेट्रो 3 चा विस्तारित मार्ग आणि चाचणीचे नियोजन

हिंजवडी ते शिवाजीनगर आणि विठ्ठलवाडी या मार्गावरील चाचण्यांना नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होत आहे. या चाचण्यांचा भाग म्हणून आता मेट्रो गाड्या बालेवाडीहून (Balewadi) बाणेरकडे धावतील. या विस्तारित चाचणी टप्प्यात सिग्निलिंग (Signaling), ट्रेन-नियंत्रण प्रणाली (Train-Control Systems), स्टेशनची तयारी (Station Readiness) आणि इतर पायाभूत सुविधांचे (Infrastructure) सखोल मूल्यांकन केले जाईल.

( नक्की वाचा : Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती )
 

सध्या सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये या मार्गावरील सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक (Technical and Operational) बाबींची तपासणी केली जात आहे. या विस्तारित चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, हा संपूर्ण मार्ग मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com