Republic Day: Swargate मेट्रो स्टेशनवरून डायरेक्ट स्वारगेट बस स्थानकात जाता येणार, पुणेकरांसाठी मोठी बातमी

Pune Metro Line 3: शिवाजीनगरचा हा अंडरपास भविष्यात पुणे मेट्रोच्या 'लाईन 3' (हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेला जोडला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Pune Metro- 2 भुयारी मार्ग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरू होण्याची शक्यता
  • अंडरपासमधील अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन मार्गांची पाहणी पूर्ण
  • स्वारगेट अंडरपासमुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनवरून थेट बस स्टँडवर जाता येणार
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

Shivajinagar-Swargate Metro Underpasses: पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होत असून, ही सेवा आणखी विस्तारत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच नियोजनाचा एक भाग असलेल्या शिवाजीनगर आणि स्वारगेट या पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या मेट्रो स्थानकांवरील भुयारी मार्ग (Underpasses) पुढच्या आठवड्यात, बहुधा २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात न घालता, रस्ता ओलांडण्याची कसरत न करता सुरक्षितपणे मेट्रो स्थानकात प्रवेश करणं आणि या मेट्रो स्थानकातून बाहेर पडणं शक्य होईल.

नक्की वाचा: Pune News: हापूस आंब्याच्या पेटीचा दर फुटला, किंमत ऐकून थंडीतही फुटेल घाम

मेट्रो सुरक्षा आयुक्तांची (CMRS) मंजुरी अंतिम टप्प्यात 

या दोन्ही अंडरपासच्या कामाची आणि सुरक्षिततेची पाहणी करण्यासाठी 'मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त' (CMRS) यांच्या पथकाने नुकताच आपला दौरा पूर्ण केला आहे. अंडरपासमधील अग्निशमन यंत्रणा, हवा खेळती राहण्यासाठीची व्यवस्था (Ventilation), प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग या सगळ्याची बारकाईने पाहणी करण्यात आली आहे. महामेट्रोला आता अंतिम प्रमाणपत्राची प्रतीक्षा असून, ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे अंडरपास प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील. 

काय आहेत या अंडरपासची वैशिष्ट्ये? 

1. स्वारगेट मेट्रो स्टेशन

स्वारगेट हे मल्टि-मोडल हब म्हणून विकसित केले जात आहे. येथील अंडरपास प्रवाशांना थेट मेट्रो प्लॅटफॉर्मवरून 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या' (MSRTC) एसटी स्टँडवर जाता येईल.  यामुळे प्रवाशांना मुख्य रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही. हे काम डिसेंबरमध्येच पूर्ण झाले होते, परंतु केवळ प्रमाणपत्राअभावी ते थांबले होते.

2. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन

शिवाजीनगर येथील अंडरपासमुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकातून थेट 'शिमला ऑफिस' चौकाकडे जाता येईल. शिवाजीनगर हे रेल्वे स्टेशनलाही जोडलेले असल्याने, या अंडरपासमुळे रेल्वे-मेट्रो-पीएमपीएल या तिन्ही सेवांचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.

Advertisement

नक्की वाचा: यंदा आपल्या देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे,77वा की 78वा? जाणून घ्या

शिवाजीनगरचा हा अंडरपास भविष्यात पुणे मेट्रोच्या 'लाईन 3' (हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेला जोडला जाणार आहे. शिमला ऑफिस चौकाच्या कोपऱ्यावर महामेट्रोने एक स्वतंत्र इमारत उभारली आहे, जिथे प्रवासी 'सिव्हिल कोर्ट-पिंपरी' मार्गिकेवरून उतरून 'हिंजवडी' मार्गिकेवर जाऊ शकतील. हिंजवडी मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर या दोन्ही स्थानकांवरील प्रवाशांची संख्या दररोज 20 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. पुणे मेट्रो केवळ मेट्रो चालवण्यावरच नाही, तर 'मल्टि-मोडल इंटिग्रेशन'वर भर देत आहे. याचाच भाग म्हणून या अंडरपासच्या बाहेर पीएमपीएल (PMPML) बस थांबे आणि रिक्षा स्टँडसाठी विशेष जागा आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानकाजवळील पादचारी पुलाचे (FOB) कामही आता अंतिम टप्प्यात असून तेही लवकरच सुरू होईल. दरम्यान, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या परिसरात महामेट्रोचे 'मेट्रो भवन' (प्रशासकीय कार्यालय) तयार झाले असून लवकरच मेट्रोचे सर्व कामकाज या अत्याधुनिक इमारतीतून चालवले जाईल.