जाहिरात

Republic Day 2026 Of India 77th or 78th? यंदा आपल्या देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे,77वा की 78वा? जाणून घ्या

Republic Day 2026 Of India 77th or 78th?: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. याच दिवशी संविधान लागू झाले होते.

Republic Day 2026 Of India 77th or 78th? यंदा आपल्या देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे,77वा की 78वा? जाणून घ्या
"Republic Day 2026 Of India 77th or 78th?: 77वा की 78वा, भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन?"
Canva
  • भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.
  • वर्ष 2026मध्ये भारत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय
  • 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Republic Day 2026 Of India 77th or 78th?: दरवर्षी अनेकांना या गोष्टीबाबत संभ्रम असतो की यंदा कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार  आहे. हा संभ्रम दूर करणे आवश्यक आहे, कारण योग्य माहिती केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर या दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरते. या निमित्ताने संपूर्ण देशात भव्य संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भारत प्रजासत्ताक देश कोणत्या वर्षी झाला? 

भारत 26 जानेवारी 1950 रोजी पूर्णतः प्रजासत्ताक देश झाला. याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आणले गेले. देशातील नागरिकांना नवीन कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार प्राप्त झाले. हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत ऐतिहासिक मानला जातो. याच दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीनंतर स्वतंत्र शासन व्यवस्थेकडे निर्णायक पाऊल टाकले आणि संविधानाच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकार तसेच कर्तव्ये निश्चित करण्यात आली.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

यंदा आपण कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, 77वा की 78वा? Is India Celebrating The 77th Or 78th Republic Day In 2026?

  • भारत देशाचा पहिला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला.
  • तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातोय. 
  • थेट आणि सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर यंदा आपण 77वा प्रजासत्ताक दिन (77th Republic Day) साजरा करतोय
  • हे समजून घेण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक तारखा पाहण्याची आवश्यकता आहे. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. या दिवशी भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश बनला.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार, यंदाची थीम गणेशोत्सव)

भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिवस कसा? काय आहे गणित?
  • 26 जानेवारी 1950- पहिला प्रजासत्ताक दिवस 
  • 26 जानेवारी 1951- दुसरा प्रजासत्ताक दिवस 
  • 26 जानेवारी 1959- दहावा प्रजासत्ताक दिवस  
  • 26 जानेवारी 2025- 76वा प्रजासत्ताक दिवस 
  • 26 जानेवारी 2026- 77वा प्रजासत्ताक दिवस  

Happy Republic Day 2026 Wishes Quotes: भारताची खरी ओळख विविधतेत एकता, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(नक्की वाचा:Happy Republic Day 2026 Wishes Quotes: भारताची खरी ओळख विविधतेत एकता, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!)

Republic Day 2026 FAQsप्रश्न 1: राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरील भव्य पथसंचलनासाठी यंदा प्रमुख पाहुणे कोण असणार? | Republic Day 2026 News  उत्तर:
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

प्रश्न 2: महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची यंदाची थीम काय आहे?

उत्तर: यंदा राज्याच्या वतीने 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com