रेवती हिंगवे, पुणे
Pune Crime News : तरुणीने लग्नासाठी नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकाराने तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेयसीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर व्हायरल करायची धमकी दिली होती. मात्र तरुणीने दाखवलेल्या संयम आणि हिमतीने मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पुण्यातील IT कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीच्या जुन्या प्रियकरानेच तिला अडचणीत आणले होते. आरोपी तरुण आणि फिर्यादी तरुणी हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र मागील एक वर्षापासून काही कारणामुळे या दोघात वाद झाल्याने ते वेगळे झाले होते.
(नक्की वाचा- पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, बाप-लेकाचं घृणास्पद कृत्य)
मात्र तरुणाला हे ब्रेकअप मान्य नव्हते. तर तरुणीला तरुणाला टाळत होती. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणाने माझ्याशी लग्न कर असा तगदा तरुणीच्या मागे लावला होता. मात्र तरुणी नकारावर ठाम होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रिलेशनशिपमध्ये असतानाचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
(नक्की वाचा - Crime News : दोन तरुणांनी भररस्त्यात अडवून 18 वर्षीय तरुणीला संपवलं, घटना CCTV मध्ये कैद)
बदनामीच्या भीतीने तरुणीने पुढील धोका ओळखून पोलिसांत धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.