Pune News: शासकीय वसतिगृहात देशविरोधी घोषणाबाजी! दोन तरुणांवर गुन्हा दाखल, शहरात खळबळ

या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, वसतिगृहातील सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी आणि नक्षलवादी विचारसरणीचा प्रसार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील एका शासकीय वसतिगृहात देशविरोधी विचारांचा प्रसार झाल्याची घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षलवादी विचारसरणीचे समर्थन करणारी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात चिंतेचे वातावरण असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविघातक विचार पेरले जात असल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल 2026 रोजी वसतिगृहात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही तरुणांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला बाधा निर्माण होईल, अशा पद्धतीची घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. नक्षलवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारे विचार याठिकाणी मांडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: पुरंदरच्या जंगलात भयंकर घडलं, दिड हजार एकरवर तांडव, शेतकरी वर्गात मोठी दहशत

याप्रकरणी पोलिसांनी किरण नारायण गोमासे (वय 22) आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी (वय 23) यांच्यासह इतर काही जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. 

नक्की वाचा - Shocking news: चंद्रपूर हादरलं! गुप्तधनासाठी विधवा अन् कुमारिकांचा वापर, लैंगिक शोषण अन् अघोरी पूजा

शासकीय वसतिगृहांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांवर आता प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. अशा प्रकारच्या देशविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत. नक्षलवादी विचारसरणीचा प्रसार केल्याच्या आरोपावरून किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, वसतिगृहातील सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.