Pune News: शिवनेरी किल्ल्याला कशाचा विळखा? जुन्नरकरांचा संताप, ऐतिहासिक वारसा झाकोळल्याचे वास्तव

शिवनेरीच्या पायथ्याशी नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. याविरोधात जनमत तयार करण्यासाठी सध्या जुन्नरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याचे अस्तित्व आता अवैध बांधकामांच्या विळख्यात सापडले आहे. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून किल्ल्याचे दर्शन घेणेही आता कठीण झाले आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे हा ऐतिहासिक वारसा झाकोळला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विरोधात आता जुन्नरचे लोक आणि शिवप्रेमी एकवटले आहेत. शिवाय या अवैध बांधकामावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी या संदर्भात आवाज उठवला आहे. त्यांच्या मते, जुन्नरच्या मुख्य चौकातून पूर्वी शिवनेरी किल्ला स्पष्ट दिसत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत किल्ल्याच्या परिसरात आणि शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यामुळे पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना किल्ल्याचे दर्शन घेताना अडथळे येत आहेत. या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य जपण्याऐवजी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिमेंटचे जंगल वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: 'मार्क्स वाढवायचेत', प्रिंसिपलचा विद्यार्थीनीला भयंकर प्रस्ताव, फ्लॅटवर नेले पण त्याच वेळी...

या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तांबे यांनी शिवाजी चौकात दोन मोठे फलक लावले आहेत. नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम हाती घेतली आहे. "शिवनेरी वाचवा, वारसा जपा" अशा स्वरूपाचे आवाहन या मोहिमेद्वारे केले जात आहे. स्थानिकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता तरी ही अवैध बांधकामं तोडली जाणार का? त्यांच्यावर काही कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे. शिवनेरीला बसलेला हा विळखा कधी उटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

नक्की वाचा - Success Story: ना कश्मीर ना हिमाचल! महाराष्ट्रातल्या 'या' गावात सफरचंदाची शेती, शेतकरी मालामाल

विशेष म्हणजे, शिवनेरी किल्ल्याचा समावेश आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या किल्ल्याचे महत्त्व वाढत असताना, स्थानिक पातळीवर मात्र अवैध बांधकामांवर कारवाई होत नसल्याने इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून स्थानिक राजकारणही तापले असून, आमदार शरद सोनवणे यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तानाजी तांबे यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने ही बांधकामे हटवून किल्ल्याचा परिसर मोकळा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.