जाहिरात

Shocking news: 'मार्क्स वाढवायचेत', प्रिंसिपलचा विद्यार्थीनीला भयंकर प्रस्ताव, फ्लॅटवर नेले पण त्याच वेळी...

पीडित तरूणीने मैत्रिणीच्या मदतीने तक्रार करण्याचे धैर्य दाखवले. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झाले.

Shocking news: 'मार्क्स वाढवायचेत', प्रिंसिपलचा विद्यार्थीनीला भयंकर प्रस्ताव, फ्लॅटवर नेले पण त्याच वेळी...
  • रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयातील उपप्राचार्यने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले
  • एलएलबी प्रथम वर्षातील विद्यार्थिनीला काही विषयांत नापास झाल्यामुळे उपप्राचार्यने पास करण्याचे आश्वासन दिले
  • या बदल्यात उपप्राचार्यने विद्यार्थिनीला महाविद्यालयाबाहेर बोलावून एका फ्लॅटमध्ये नेल.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
रायगड:

राहुल कांबळे 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला डाग लावणारी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयात हा प्रकार समोर आला आहे. कॉलेजचे उपप्राचार्यांनी एका विद्यार्थिनीकडे पास करून देण्यासाठी नको त्या गोष्टीची मागणी केली. शिवाय तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप या विद्यार्थीनीने केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधीत उपप्राचार्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

संबंधित विद्यार्थिनी एलएलबी (LLB) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे काही विषय राहीले होते. ती या विषयांत नापास झाली होती. या विषयात पास करून देण्यासाठी उपप्राचार्यांने तिच्या समोर भयंक प्रस्ताव ठेवला होता. ज्या वेळी ही विद्यार्थीनी आपला या विषयाक कमी मार्क कसे मिळाले हे विचारण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये गेली होती. त्यावेळी तिला तूला पास करण्याची जबाबदारी माझी आहे. तु काळजी करू नको. तू माझ्या एक मैत्रिणी सारखी दिसते. ती आता या जगात नाही. मी तुला लाईक करतो असं प्रिसिपल त्या विद्यार्थिनीला बोलले. ते अयोग्य भाषेत संवाद साधून मर्यादा ओलांडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नक्की वाचा - Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक

10 एप्रिल रोजी हे प्रकरण अधिक गंभीर झाले. उपप्राचार्यांनी विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या बाहेर बोलावून खोपोली परिसरात नेण्याचा प्रयत्न केला. तिथे एका फ्लॅटमध्ये ते या विद्यार्थीनीला घेवून गेले. विद्यार्थीनी त्यावेळी लिफ्टमध्ये होती. इथं काही तरी भयंकर इराद्याने प्रिसिपल यांनी आपल्याला आणलं आहे याची खात्री तिला झाला. त्यामुळे विद्यार्थीनीने लिफ्टमधूनच पळ काढला. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत या सर्व प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे व्हिडिओ आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानले जात आहेत. सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत धाव घेतली आहे.

नक्की वाचा - Viral News: 70 वर्ष जुन्या बंगल्याची विक्री! नानावटींच्या 'या' ऐतिहासिक बंगल्याची किमत माहित आहे का?

तक्रार दाखल झाल्यानंतर उपप्राचार्य असलेल्या डॉ. मारुफ बशीर याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच बरोबर प्रत्येक विषय सोडवण्यासाठी सहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोपही पिडीत तरुणीने केला आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटत आहे. कॉलेजमध्ये ही तणावाचे वातावरण आहे. दोषीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित तरूणीने मैत्रिणीच्या मदतीने तक्रार करण्याचे धैर्य दाखवले. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com