- केतन अग्रवाल यांच्या हत्येची योजना सिया आणि तिच्या बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी काळजीपूर्वक आखली होती
- चेतनने गुगल हिस्ट्री डिलीट करायचं विसरल्यामुळे त्याच्या शोधातून हत्येच्या प्लॅनिंगची साक्ष पोलीसांना मिळाली
- हत्येच्या दिवशी चेतनने आपला मोबाईल दुकानात नोकराकडे ठेवला आणि तो स्वतः लोहगडावर गेला, ज्यामुळे संशय वाढला
केतन अग्रवालच्या हत्येनं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं त्या सियानेच त्याची हत्या केली. या हत्येत सियाची खऱ्या अर्थाने मदत केली ती तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याने. यासाठी त्यांनी पहिला मार्ग निवडला तो क्राईम पेट्रोलचा आणि दुसरा मार्ग तंत्रज्ञानाचा. पण आरोपी किती ही हुशार असला तरी तो मागे काही ना काही पुरावे ठेवतो. तेच या दोघांनी ही केले. त्यांनी सर्व काही शांत डोक्याने प्लॅन केले होते. पण त्यांच्या दोन चुका त्यांना जेलच्या चार भिंतीत घेवून गेल्या. या बाबी आता पोलीस तपासात पुढे येत आहेत.
चेतन चौधरी आणि सिया यांचे प्रेम होते. पण सियाचे लग्न केतन अग्रवाल सोबत ठरले होते. साखरपुडा ही झाला होता. लग्नाची तयारी सुरू होती. त्याच वेळी चेतन आणि सिया केतनला आपल्या मधून बाजूला कसं करता येईल यासाठी प्लॅन करत होते. त्यानुसार त्यांनी लोहगडची निवड केली होती. तिथून त्याला खाली ढकलायचे आणि अपघात झाला असे दाखवायचे असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं त्यानुसार त्यांनी हत्या ही केली. त्यात त्यांना यश ही मिळालं. सर्व काही त्यांनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे होत होते. त्यामुळे सिया आणि चेतन बिंदास्त होते. आपला मार्ग मोकळा झाला या अविर्भावात ते आले होते. पण ते तिथेच चुकले.
ही हत्या करताना या दोघांनी ही काही पुरावे मागे ठेवले होते. हेच पुरावे त्यांना गजाआड घेवून जाण्यास कारणीभूत ठरले. त्यांची प्लॅनिंग पक्की होती. पण चुका ही त्यांनी पक्क्या केल्या होत्या. सर्वात आधी गुगल हिस्ट्री. मे महिन्यापासूनच चेतन गुगलवर ट्रेकिंगला गेलेल्याची हत्या अपघातात कशी दाखवायची याबाबत काही गोष्टी सर्च करत होता. हे सर्च करत असताना गुगली हिस्टीर डिलीट करण्यास तो विसरला. ज्या वेळी पोलीस या केसचा तपास करत होते. त्यावेळी त्यांनी चेतनची गुगल हिस्ट्री चेक केली. त्यात त्यांना या गोष्टी आढळल्या. गुगल हिस्ट्री डिलीट न केल्यामुळे चेतन अलगद पोलीसांच्या जाळ्यात अडकला. ही या दोघांची ही पहिली चूक होती. जी थेट हत्येचा सहभाग किंवा कटाचे प्लॅनिंग दर्शवते.
दुसरी गोष्टी थेट क्राईम पेट्रोलशी जोडली गेली आहे. क्राईम पेट्रोलमध्ये अनेक वेळा मोबाईल लोकेशन समजू नये म्हणून आरोपी काय करतात हे दाखवले गेले आहे. हिच गोष्ट होवून चेतनने हत्येच्या दिवशी प्लॅन केला होता. त्याने हत्येच्या दिवशी आपला मोबाईल दुकानात आपल्या नोकराकडे ठेवला होता. त्याच वेळी नोकराचा मोबाईल चेतन आपल्या सोबत लोहगडावर घेवून गेला होता. याकाळात चेतनच्या फोनवर अनेक फोन आले. हे फोन चेतनने उचलले नाहीत. तर त्या नोकराने उचलले. तपासात ही बाब समोर आली. ज्या लोकांनी चेतनला फोन केले होते त्यांची चौकशी करण्यात आली. त्या सर्वांनी ही चेतनने आमचा फोन उचलला नाही असं सांगितलं.
त्याला कारण चेतन त्यावेळी लोहगडावर होता. या दोन गोष्टीमुळे पोलीसांचा संशय अधिक पक्का झाला. त्यांनी दोघांना ही ताब्यात घेतलं. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी ही आपला गुन्हा कबुल केला. आता कोर्टाने दोघांना ही सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या वेळी होणाऱ्या चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता आहे. जर सिया केतन अग्रवाल सोबत खुश होती तर तिने हे पाऊल का उचलले. तिने जे व्हिडीओ शेअर केले आहेत त्यावरून तरी ती खुश असल्याचे दिसते.शिवाय तिच्या साखर पुड्यातही तिचे वावरणे हे सहज होते. मग मधल्या काळात असं काय झालं की सिया केतनच्या जिवावर उठली. आत पोलीस चौकशीत या गोष्टी समोर येणार आहेत.