Pune News: स्पा, लॉजच्या नावाखाली नको ते धंदे!, पोलीसांची धाड अन् मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, अनेक तरुणींची सुटका

जानेवारी २०२६ मध्ये निगडीतील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर छापे टाकून महिलांची सुटका करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई केली आहे
  • शहरातल्या स्पा आणि लॉजवर सुरू होते नको ते धंदे चार पीडित महिलांची सुटका
  • स्पा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

पिंपरी चिंचवड शहरातील अवैध वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीचे प्रकार सर्रास पुणे सुरू होते. याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सार्वजनिक ठिकाणी अवैध कृत्य चालणाऱ्या 3 आस्थापनांना 1 वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. इथं स्पा आणि लॉजच्या नावाखाली नको ते धंदे केले जात होते. पोलीसांनी या धाडीत सर्वांना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे निलख येथील इंटर्नल फॅमिली स्पा वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. या कारवाईत 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मूळचा आसामचा असलेला स्पा मॅनेजर अब्दुल मोहमद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. जानेवारी 2026 मध्ये ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय आढळला होता. अशा 3 आस्थापनांना पोलीस आयुक्तांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात  निक्की लॉज (चिंचवड), लेमन ग्रास थाई स्पा (काळेवाडी), औरा थाई स्पा (सांगवी) यांचा समावेश आहे. 

नक्की वाचा - Sunetra Pawar: अर्थ खातं नाही पण 'या' दोन जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांकडे कायम, शासन निर्णय ही निघाला

जानेवारी २०२६ मध्ये निगडीतील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर छापे टाकून महिलांची सुटका करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 2025 या वर्षात  एकूण 28 ठिकाणी छापे टाकले होते. त्यात 8 स्पा, 7 हॉटेल, 3 फ्लॅट आणि 10 ऑनलाईन छापे टाकून 45 आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच 63 महिलांची सुटका केली होती. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या 107 महिलांवर 70 गुन्हे  देखील नोंदवण्यात आले आहेत. त्यातून अशा घटनांना पायबंद घालण्याचा पोलीसांचा प्रयत्न होता.  

नक्की वाचा - Shocking news: 12 वर्षाच्या मुलीवर 2 महिने सतत अत्याचार, गर्भवती राहीली अन् बिंग फुटलं, हॉस्टेलमध्ये काय घडलं?

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईनंतर तरी शहरातल्या अशा अवैध व्यवसायांना आळा बसेल अशी अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत. आता कारवाई होते पण काही दिवसांनी पून्हा हे धंदे सुरू होतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या कारवाईनंतर तरी ही अवैध धंदे पूर्ण पणे बंद होणार आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. 
 

Advertisement