Pune News: पुणेकरांनो सावध व्हा! तुमच्यावर असणार आहे आता फिरत्या कॅमेऱ्याची नजर

पुणेकरांवर आता कॅमेऱ्याची नजर असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

वाहतूक समस्या आणि पुणे यांचे एक वेगळेच नाते आहे. पुण्यातील वाहतूक शिस्तीवर तर अनेक वेळा टीका होते. पुणेकर वाहतुकीची  शिस्त पाळत नाहीत असं बोललं जातं. त्याचे अनेक व्हिडीओ ही व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. हेल्मेट सक्तीला ही पुण्यातून मोठा विरोध झाला होता. आता पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे आरटीओने मोठं पाऊल उचललं आहे. या माध्यमातून पुणेकरांवर कॅमेऱ्या द्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे.  

पुणेकरांवर आता कॅमेऱ्याची नजर असेल. वाहतूक नियम उल्लंघनाबाबत फिरत्या कॅमेऱ्याची नजर त्यांच्यावर  असणार आहे. पुणे आरटीओने प्रायोगिक तत्त्वावर एक खास स्कॉर्पिओ वाहन तयार केले आहे. त्यावर तब्बल आठ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ही स्कॉर्पिओ सध्या जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन रोडवर फिरवली जात आहे. ही कार वाहतूक सुरळीत कशी राहील, नियमांचे उल्लंघन होणार नाही यावर नजर ठेवेल. 

नक्की वाचा - Pune News : पोलिसांच्या वाहनामुळेच चाकणमध्ये वाहतूक कोंडी, सामान्यांच्या त्रासात भर

या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवणार आहे. सिग्नल तोडणे, चुकीचे पार्किंग, ट्रिपल सीट, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, या सारख्या नियमभंगांची नोंद ही कॅमेरा असलेली कार ठेवणार आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे. याचा फायदा वाहतूक सुरळीत ठेवण्यास होईल असं ही त्यांनी सांगितलं. शिवाय वाहतुकीची शिस्त ही लागेल असं ते म्हणाले. 

 Pune News : चाकण भागातील वाहतूक कोंडी कशी दूर होणार? अजित पवारांनी सांगितला उपाय 

सध्या या यंत्रणेतील चलान प्रणाली सक्रिय करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ती सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. NDTV मराठी बरोबर बोलताना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, की "प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केला आहे. तो यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील इतर प्रमुख रस्त्यांवरही असे फिरते सर्विलन्स कार्यान्वित केले जाईल. या नव्या तंत्रज्ञानामुळे वाहतूक शिस्तीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement