Pune News: पुण्यात रंगली आणखी एक 'रेव्ह पार्टी', 'प्रोजेक्ट एक्स' च्या नावाखाली तरुण-तरुणी झिंगले अन् आता..

या पार्टीत वापरले जाणारे संशयित आमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

यशपाल सोनकांबळे 

गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्यात पुणे अडकलं आहे की काय असं बोलण्याची वेळ आली आहे. पुणे पोलीस किती ही दावा करत असले तरी आज ही पुण्यात ड्रग्ज, अवैध धंदे, गुन्हेगारी याच्यात काही कमी झाली आहे असे नाही. नुकतेच पुण्यात विषारी दारूने पंधरा पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले. हे प्रकरण ताजे असतानाच आता एक रेव्ह पार्टी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्वच जण पुन्हा एकदा हादरून गेले आहे. विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात हे काय सुरू आहे हे म्हणण्याची वेळा आता पुन्हा एकदा आली आहे. काही महिन्या पूर्वी ही पुण्यात रेव्ह पार्टी झाल्याचे समोर आले होते. 

पुण्यात पुन्हा एका कथित रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावर एक खासगी रिसॉर्ट आहे. याच रिसॉर्टमध्ये ही रेव्ह पार्टी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 'प्रोजेक्ट एक्स' नावाने या पार्टीचे आयोजन करण्यात आली होती. शहरातल्या तरुणी आणि तरुणींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे या पार्टीसाठी येणाऱ्या तरुणी आणि तरुणींचा उत्साह शिगेला होता. त्याच वेळी पोलीसांची एन्ट्री झाली आणि एकच धावपळ सर्वांचीच उडाली. अनपेक्षित रेडने सगळेच हादरले. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: न्यूजपेपरच्या कागदात आता विकता येणार नाही वडापाव, तसं कराल तर थेट..., FDA चा मोठा निर्णय

या कथीत रेव्ह पार्टीत 100 तरुण-तरुणी सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी एकच धावपळ उडाली. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर काही जण झिंगलेल्या अवस्थेत पोलीसांच्या तावडीत सापडले आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्यांना चौकशीसाठी पोलिसस्थानकात आणण्यात आले. त्यांची आता कसून चौकशी होता आहे.  या पार्टीत नशेसाठी ड्रग्ज वापरले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या नुसार या सर्वांची चौकशी केली जात आहे. त्यांच्या चौकशीतून काय बाहेर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नक्की वाचा - LPG price hike: महागाईचा भडका! सिलिंडर 29 रुपयांनी महाग, महाराष्ट्रातला दर किती?

या पार्टीत वापरले जाणारे संशयित आमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. विना परवाना दारू आणि साउंड सिस्टीमचा वापर होत असल्याचे यात उघड झाले आहे.  शिवाय या पार्टीत अमली पदार्थांच्या वापराचा संशय पोलिसांना आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र या पार्टीमुळे पुन्हा एकाद कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात बरोबर ड्रग्जचा पुण्याला विळखा घातला आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली होती.