Pune News: रुपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, आता तर सख्खा भाऊच...

त्यामुळे चाकणकरांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाही अशीच स्थिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कमी होण्याचं काही नाव घेत नाही. त्यांना एकमागून एक धक्के लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय दृष्ट्या भविष्यात अडचणी वाढण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मोठा झटका बसला. त्याना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण ताजे असतानाच आता त्यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांना ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भावाच हा पराभव चाकणकर यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.   

दौंड तालुक्यातील नांदुर ग्रामपंचायतीची सरपंच पोट-निवडणूक झाली. या निवडणुकीत  राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बबन बोराटे निवडणूक रिंगणात होते. त्यांना कुल गटाकडून मैदानात होता. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्या दृष्टीने त्यांनी प्रचार ही केला होता. आमदार राहुल कुल यांची ताकद आणि बहीण रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा बोराटे यांच्यासाठी जमेची बाजू होती. पण त्यांचा अंदाज चुकला. 

Advertisement

नक्की वाचा - Beed News:'तुझी बहीण होती ना ती, तरी गुलाल उधळलास' संतोष देशमुखांच्या आईचा उद्विग्न सवाल

संतोष बबन बोराटे यांना मोठ्या फरकाने पराभव सहन करावा लागला. त्यांचा  विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल 304 मतांनी पराभव केला आहे. कुल गटाकडून संतोष बोराटे मैदानात होते. तर थोरात गटाने विशाल थोरात यांच्यावर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे. स्थानिक समीकरणे आणि धनगर समाजाच्या पाठिंब्यावर विशाल थोरात यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर पुन्हा थोरात गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले. हा बोराटे यांचा पराभव नसून कुल यांना ही दणका आहे. पण सर्वात मोठा फटका हा रुपाली चाकणकर यांना समजला जात आहे. 

नक्की वाचा - Cabinet decision:'साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर' राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीत आल्या. त्यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या विरोधकांचे त्यावर ही समाधान झाले नाही. आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम होत्या. पण त्या पदाचाही राजीनामा त्यांच्याकडून पक्षाने घेतला. त्यामुळे एकाच वेळी दोन धक्के चाकणकरांना सहन करावे लागले.या सर्व घडामोडी होत असताना खरात प्रकरणात नवनवे  खुलासे होत होते. आता तर सख्ख्या भावालाच ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. त्यामुळे चाकणकरांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाही अशीच स्थिती आहे.