- शाहिद कपूर, रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकेतील 'कॉकटेल 2' चित्रपटाचे प्रमोशन पुण्यात झाले
- पुण्यातील विमाननगर येथील मॉलमध्ये आयोजित संगीत लॉन्च कार्यक्रमात चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीमुळे गोंधळ
- कलाकारांना चाहत्यांच्या धक्काबुक्कीचा सामना करावा लागला
यशपाल सोनकांबळे
शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनन यांची प्रमुख भूमीका असलेला 'कॉकटेल 2' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे जोरदार प्रमोशन सध्या हे तिन्ही कलाकार करत आहे. मुंबई,पुणे, नागपूर दिल्लीत या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. सध्या या चित्रपटाचे म्युझिक लॉन्चचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यातील एक कार्यक्रम पुण्यात झाला. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले. लॉन्च वेळी इथं जमलेल्या चाहत्यांकडूनच या तिन्ही कलाकारांना धक्काबुक्की सहन करावी लागली.
शाहिद कपूर, रश्मिका मंदाना, कृती सॅनन यांना पुण्यात 'कॉकटेल 2' चित्रपट प्रमोशन कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. विमाननगर येथील नामांकित मॉलमध्ये या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहिद कपूर, रश्मिका मंदाना येणार आहेत याची खबर वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. त्यामुळे या मॉलमध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांची एक झलक पाहायची होती.
त्यामुळे कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली होती. त्यातून एकच गोंधळ उडाला होता. कलाकार स्टेजवर येताच ही गर्दी अनियंत्रीत झाली. सगळीकडे गोंधळ निर्माण झाला. चाहत्यांना शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांना भेटायचे होते. त्यामुळे ही अनियंत्रित गर्दी कलाकारांच्या दिशेने थेट गेली. चाहते थेट कलाकारांच्या दिशेने सरसावल्याने परिस्थिती आणखी बिघडली. या अनियंत्रि गर्दीमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ते तिथून जाण्यासाठी निघाले. त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
अशा स्थितीत चाहत्यांचा संताप झाला. त्यांनी या कलाकारांना धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तर आणखीनच गोंधळ उडाला. आयोजक आणि मॉल प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे गोंधळ वाढल्याची चर्चा होती. शिवाय अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात असा प्रकार या आधी कधी ही घडला नव्हता. सध्या या गोंधळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट प्रमोशन मात्र या घटनेमुळे बाजूलाच राहीले.