Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...

हा व्हिडीओ गृहीत धरला तर सियाला आधीपासूनच दारूची सवय होती हे स्पष्ट होत आहे. या व्हिडीओत तिच्या सोबत एक तरुण दिसत आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

सिया गोयल हीचं नाव सध्या सगळ्यांच्यात तोंडात आहे. तिच्यावर होणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. केतन अग्रवाल असं त्याचं नाव होतं.  अवघ्या 21 वर्षाच्या सियाने हा कारनामा तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केला आहे. या हत्येनंतर सियाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. काही गोष्टी सोशल मीडियावर  व्हायरल ही होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे सिया ही पार्टी गर्ल होती. ती दारू ही पित होती. नाईट लाईफ हा तिच्या लाईफ स्टाईलचा भाग होता. मात्र आमची मुलगी तशी नव्हती. ती एक साधी सरळ मुलगी होती असा दावा तिच्या आई- वडीलांनी केला आहे. या दावा केल्यानंतर सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात  तिने आई-वडीलांचा हा दावाच खोडून काढल्याचं स्पष्ट होत आहे.

जो नवा व्हिडीओ समोर आला आहे तो पहिल्या व्हिडीओ पेक्षा भयंकर आहे. या व्हिडीओत सिया एका पबमध्ये असल्याचं दिसत आहे. तिच्या हातात दारूचा ग्लास आहे. तिच्या सोबत कोणी तरी तरुणी आहे. तो ही दारू पिताना दिसत आहे. ते दोघे एकमेकांना चिअर्स करताना दिसत आहे. त्यानंतर सिया गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ अगदी वीस सेकंदाचा आहे. शिवाय तो 10 डिसेंबर 2022 सालातला आहे. म्हणजे जवळपास चार वर्षा पूर्वीचा तो व्हिडीओ आहे. यात तिने पार्टी वेअर घातला आहे. ती नशेमध्ये डान्स करत असतानाही दिसत आहे. ती पार्टी पुर्ण पणे एन्जॉय करत असताना दिसत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Siya Goyal: लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाचा नव्हताच, तो आग्रह तर... केतन हत्या प्रकरणाला वेगळं वळण

हा व्हिडीओ अशा वेळी समोर आला आहे ज्यावेळी सियाच्या आई वडीलांनी आपली मुलगी कधी ही दारू प्यायली नाही असा दावा केला आहे. ती दारू पित नाही असं ही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या व्हिडीओने सियाचे आई वडील खोटं बोलत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. की सियाच्या या सवई बद्दल त्यांना काहीच माहित नव्हते का असा ही प्रश्न निर्माण झाला आहे.  जवळपास चार वर्षा पूर्वीचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ गृहीत धरला तर सियाला आधीपासूनच दारूची सवय होती हे स्पष्ट होत आहे. या व्हिडीओत तिच्या सोबत एक तरुण दिसत आहे. 

नक्की वाचा - Lohagad Case: ना फाशी, ना जन्मठेप! सियासाठी शिक्षा ठरली, लाडक्या लेकीसाठी बापानेच भयंकर शिक्षा सुनावली

मात्र हा तरूण कोण आहे हे समजू शकलेले नाही. पण सिया पार्टीमध्ये, पबमध्ये डिस्को मध्ये जात होती. ती दारू ही घेत होती हे ही स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. तो तिच्या वाढदिवशीचा होता. त्यात ही ती आपल्या मित्रांना पबमध्ये पार्टी देताना दिसत आहे. त्या व्हिडीओत ही ती दारू पिताना दिसली आहे. आता नव्या व्हिडोची त्यात भर पडली आहे. त्यामुळे सिया हिला दारूचे व्यसन होते हे आता जवळपास निश्चित झाले आहे.