जाहिरात

Siya Goyal: लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाचा नव्हताच, तो आग्रह तर... केतन हत्या प्रकरणाला वेगळं वळण

शिवाय लग्नासाठी 17 कोटी नाही तर 3 ते 4 कोटी लागणार होते. शिवाय केतनच्या कुटुबींयांचा विमान बुक केल्याचा दावा ही सियाच्या आईने फेटाळून लावला आहे.

Siya Goyal: लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाचा नव्हताच, तो आग्रह तर... केतन हत्या प्रकरणाला वेगळं वळण
  • सियाच्या आईने सांगितले की केतन अग्रवालने लोहगडावर जाण्यासाठी सियाला आग्रह केला होता
  • लोहगडावर जाण्याच्या आधी सियाने बर्थडे पार्टीसाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता
  • लोहगडावर जाण्यासाठी केतन आणि त्याच्या आईने सियाला प्रोत्साहित केले असा दावा सियाच्या आईने केला
पुणे:

सिया गोयलबाबत आता वेगवेगळे खुलासे होत आहे. सियाचे कुटुंबीय ही ती दोषी असेल तर तिला शिक्षा करा असं सांगत आहेत. पण त्याच वेळी ते सिया ही साधी सरळ मुलगी होती असं ही सांगत आहे. याच वेळी सियाची आई सियाच्या बचावासाठी पुढे आली आहे. लोहगडावर घेवून जाण्याचा कट सियाने रचल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी ती आग्रही होती अशा ही बातम्या समोर आल्या आहेत. पण लोहगडावर जाण्याच्या आदल्या दिवशी काय झालं होतं हे सियाच्या आईने स्पष्ट केलं आहे. त्याला आपण साक्षिदार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. 

लोहगडावर जाण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 जूनला संध्याकाळी केतन अग्रवालने सियाला व्हिडीओ कॉल केला होता. त्यावेळी आपण तिथे उपस्थित होतो असं सियाच्या आईने सांगितलं. त्यावेळी केतननेच लोहगडावर माझ्या सोबत ट्रेकींगला चल असा आग्रह सियाला केला होता असा दावा तिच्या आईने केला आहे. त्यावर आपण बर्थडे पार्टी करणार आहोत. तर लोहगडावर जायला नको. आपण आराम करू. त्यानंतर पार्टीसाठी बाहेर जावू असं सियाने केतनला सांगितलं. त्याच वेळी केतनची आई ही तिथे उपस्थित होती. त्यांनी सियाला केतन बोलतोय तर लोहगडावर जा असं सुचवलं होतं असं सियाच्या आईने सांगितलं. 

नक्की वाचा - Lohagad Case: ना फाशी, ना जन्मठेप! सियासाठी शिक्षा ठरली, लाडक्या लेकीसाठी बापानेच भयंकर शिक्षा सुनावली

केतनच्या आईने सांगितल्यामुळे सिया लोहगडावर जाण्यासाठी तयार झाली होती असा दावा ही तिच्या आईने केला आहे. सियाला लोहगडावर जायचे नव्हते. तर तिथे जाण्यासाठी केतन आणि त्याच्या आईने सियाला सांगितले होते असं ही त्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत सियाने केतनला लोहगडावर येण्यासाठी दबाव टाकला होता असं सांगितलं जात होतं. पण सियाच्या आईच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. सियाच्या आईने अजून काही धक्कादायक दावे करत सियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. असं असलं तरी त्यांनी सिया दोषी असेल तर तिला शिक्षा झाली पाहीजे असं ही म्हटलं आहे. 

नक्की वाचा - Lohagad case: केतन अग्रवालच्या हत्ये मागे क्राईम पेट्रोल कनेक्शन! सिया- चेतनला 1 नाही तर 2 गोष्टी नडल्या

दरम्यान सियाने केतनला लग्न करण्याच नकार दिला होता अशी बातमी ही समोर येत आहे.तसं जर सियाने केतनला सांगितलं असेल तर त्याच वेळी केतनने आम्हाला सांगायला पाहीजे होतं. किंवा आपल्या कुटुंबीयांना सांगणं गरजेचं होतं. पण त्याने तसं केलं नाही. त्याने त्याच वेळी कुणाला ही जर ही बाब सांगितली असती तर हा प्रसंग घडलाच नसता असं ही सियाच्या आईने सांगितलं. मात्र सिया केतनवर प्रेम करत होती. त्या दोघांची जोडी चांगली जमली होती. जर तिला लग्न करायचे नसते तर तिने आम्हाला सांगितले असते असं ही त्या म्हणाल्या. सियाला केतनच्या घरचे सर्व जण चांगले चांगले म्हणत होते. पण आताच ते तिला दोष देत आहे. शिवाय लग्नासाठी 17 कोटी नाही तर 3 ते 4 कोटी लागणार होते. शिवाय केतनच्या कुटुबींयांचा विमान बुक केल्याचा दावा ही सियाच्या आईने फेटाळून लावला आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com