- पुणे शहरात दुसऱ्या टप्प्याच्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत
- काही मुख्य मार्ग जसे की ब्ल्यू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक बंद राहणार आहेत
- नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियोजन आधीच करावे, असे पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले
पुणे शहरात बुधवारी 21 जानेवारीला वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ही स्पर्धा लेडीज क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, गोळीबार मैदान चौक, शितल पेट्रोल पंप, खडी मशीन, ट्रिनिटी कॉलेज, बोपदेव घाट, खडकवासला, किरकीटवाडी, नांदेड सिटी या मार्गावर होणार आहे.
त्या अनुषंगाने ब्ल्यू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, खाण्या मारुती चौक ते सोलापूर बाजार चौकी, गोळीबार मैदार ते लुल्लानगर चौक, ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप, खडी मशीन चौक, येवलेवाडी ते बोपदेव घाट, खडकवासला ते सिंहगड रोड, किरकीटवाडी ते नांदेड सिटी, वारजे ब्रिज ते नांदेड सिटी हे मार्ग बंद राहतील. त्यामुळे या मार्गावर जाताना नागरिकांनी आधीच नियोजन करावे. ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या काळात हा मार्ग बंद राहणार आहे.
त्या ऐवजी काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. कोयाजी रोड, एम.जी. रोड, भैरोबा नाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौकामार्गे, धोबीघाट चौक, डायसप्लॉट चौक व गिरीधरभवन चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, गंगाधाम चौ मार्गे जाईल. मंम्मादेवी चौक, भैरोबानाला, लुल्लानगर, गंगाधाम, सेव्हन लव्हज, शितल पेट्रोल पंप, कौसरबाग, गंगासेटेलाईट सोसायटी, नेताजीनगर लुल्लानगर मार्गे ब्रिजखालून जाईल.
नक्की वाचा - Pune Metro 3 News: पुणेकरांसाठी प्रचंड आनंदाची बातमी, मार्चमध्ये मिळणार मोठा दिलासा
तर कान्हा हॉटेल, मिठानगर, आईमाता मंदीर, गंगाधाम चौक, लुल्लानगर, मंतरवाडी कडून येणाऱ्या वाहनांना कान्हा हॉटेल, गंगाधाम चौक, लुल्लानगर चौक, भैरोबानाला चौक, आश्रम रोड, एनआयबीएम रोड, गंगासेटेलाईट सोसायटी, नेताजी नगर लुल्लानगर मार्गे. श्रीराम चौक ते येवलेवाडी पर्यंत, धर्मावत पेट्रोलपंप ते येवलेवाडी, हडपसर-सासवड- बोपदेव घाट, कात्रज- शिंदेवाडी- बोपदेव घाट. खडकवासला ते किरकीटवाडी मार्गावर पानशेत मार्गे व किरकीटवाडी ते नांदेड सिटी मार्गावर एन.डी.ए.लिंक रोड व एन.डी.ए. शिवणे रोड मार्गे व डी.एस.के. विश्व, वडगाव धायरी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.