Pune Palkhi Marg : दरवर्षी लाखो संख्येने भाविक वारीत सहभागी होत असतात. त्यांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून 'टॉयलेट सेवा' (Pune Palkhi Toilet Service app) नावाचं अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. वारीमध्ये सामील होणाऱ्या लाखो भाविकांना पालखी मार्गादरम्यान कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टॉयलेट सेवा नावाचं अॅप सुरू करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून भाविकांना पालखी मार्गावरील टॉयलेट सेवेची माहिती मिळू शकेल.
नक्की वाचा - Live Update : भोपखेल फाट्याजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतीक्षा, पुणे पोलिसांची टीम सज्ज
पालखी मार्गावर विविध ठिकाणी मोबाइल टॉयलेट बसवण्यात आले आहेत. पुण्यातून जात असताना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तब्बल 1,800 मोबाइल टॉयलेट तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 1,200 मोबाइल टॉयलेट बसवण्यात आले आहेत. तर संत सोपान महाराज पालखी मार्गावर 300 मोबाइल टॉयलेट आहेत.
यासाठी विशेष मोबाइल अॅप सुरू करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून तिन्ही पालखी मार्गावरील मोबाइल टॉयलेट सेवेबाबत माहिती मिळू शकेल.