Pune Palkhi 2025 : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या सकाळीच मार्गस्थ; माऊलींचं दर्शन कुठे घेता येईल?

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Palkhi 2025 : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी ६ वाजता मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर येथे असेल. 

- तुकारामांची पालखी सकाळी साधारण 7 वाजता निवडुंगा विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ झाली.  

- संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने 7.35 च्या दरम्यान रेस कोर्स पार केले आहे. 

पालखी सोहळा कसा कराल ट्रॅक (Pune Palkhi Live Tracking )

दरवर्षी लाखो वारकरी पालखी सोहळ्यासाठी पुण्यनगरीत वास्तव्यास येत असतात तर अनेक VIP देखील या दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी येतात. दोन्ही पालख्यांच्या मिळून एकूण ७१९ दिंड्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असतील. २० जूनपासून या पालखी सोहळ्याचं लाइव्ह ट्रॅकिंग सुरू करण्यात आलं. आज दोन्ही पालख्या मुक्कामाच्या ठिकाणीहून निघाल्या आहेत. तुम्हालाही पालखीत सामील व्हायचं असेल तर या मॅपवरुन तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. याशिवाय पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत काही बदल केले असतील तर त्याही माहिती मिळेल. येथे तुम्हाला पार्किगच्या सुविधा कुठे कुठे उपलब्ध आहेत, याचीही अपडेट मिळू शकेल. 

Advertisement

पुणे पालखी ट्रॅक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world