Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video

Pune PMC Election 2026: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबार आणि खुनासारखे गंभीर आरोप आहेत, त्यानं चक्क नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune PMC Election 2026: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवत आहे.
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune PMC Election 2026: पुणे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते, परंतु सध्या येथील राजकारणाचे जे चित्र समोर येत आहे ते अतिशय अस्वस्थ करणारे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असला तरी, जेव्हा गुंडांच्या टोळ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या मनात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबार आणि खुनासारखे गंभीर आरोप आहेत, त्यानं चक्क नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे, त्याला पोलिसांनी व्हॅनमधून खाली उतरवले तेव्हा त्याच्या तोंडावर काळं फडकं बांधलेलं होतं आणि हाताला दोऱ्या होत्या. अशा स्थितीतही त्याने आरडाओरडा करत घोषणा द्यायला सुरुवात केली.

भर रस्त्यात घोषणाबाजी

पोलिसांच्या ताब्यात असतानाही बंडू आंदेकरचा माज कमी झालेला दिसत नव्हता. 'नेकी का काम आंदेकर का नाम' अशा घोषणा तो देत होता. मला लोकशाहीत कसं आणलंय ते बघा, आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत, मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही, अशा आशयाची वक्तव्य त्याने अर्ज भरताना केली. 

बंडू आंदेकर सध्या आयुष कोमकर याच्या खुनाप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे, तरीही त्याला खात्री आहे की जनता त्यालाच निवडून देणार. केवळ बंडू आंदेकरच नाही, तर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा : Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले! )
 

तुरुंगातून संपूर्ण कुटुंबच निवडणुकीच्या मैदानात

आंदेकर टोळीतील केवळ बंडूच नाही, तर त्याची वहिनी आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोघीही सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप आहे. या महिला उमेदवारांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात, तोंडाला फडकं बांधलेल्या अवस्थेत अर्ज भरण्यासाठी आणण्यात आले होते. 

एकाच कुटुंबातील आणि एकाच गुन्हेगारी पार्श्वभूमीतील तीन व्यक्ती तुरुंगातून निवडणूक लढवणार असल्याने पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

( नक्की वाचा : Pune News : 50 पावसाळे, शून्य खड्डे; पुण्याच्या 'या' ऐतिहासिक रस्त्याचा 1 जानेवारीला सुवर्णमहोत्सव, वाचा रहस्य )

पीडित कुटुंबाचा आक्रमक पवित्रा आणि इशारा

दुसरीकडे, ज्या आयुष कोमकरची हत्या करण्यात आली, त्याच्या आईने आंदेकर कुटुंबाच्या या उमेदवारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदेकर कुटुंबाला कोणतेही राजकीय पाठबळ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. आंदेकर निवडणूक लढवणार असतील, तर त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून प्रचार करण्याचा इशारा आयुषच्या आईने दिला आहे.

Advertisement

खुनाचे आरोप असलेल्या लोकांना जर समाजाने आणि राजकीय पक्षांनी स्वीकारले, तर सामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर प्रश्नचिन्ह

आंदेकर टोळी कोणत्या पक्षाकडून अधिकृतपणे निवडणूक लढवणार हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना यापूर्वी क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. आंदेकर कुटुंबीयांनी यापूर्वीही राष्ट्रवादीकडून निवडणुका लढवल्या आहेत आणि ते निवडूनही आले होते. त्यामुळे आताही ते अजित पवारांच्या पक्षाकडूनच रिंगणात उतरतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 

Advertisement

मात्र, यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ज्यांनी भररस्त्यात गोळ्या झाडल्या, ज्यांच्यावर खुनाचे कट रचल्याचे आरोप आहेत, अशांना अजित पवार उमेदवारी कशी देऊ शकतात? पुण्यात एकही स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार मिळत नाही का? गुंडांना राजकीय बळ देऊन नेमके काय साध्य करायचे आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Topics mentioned in this article