'माझा आणि अग्रवालचा संबंध... ' आमदार सुनील टिंगरेंनी काय केला खुलासा?

Pune Posrshe Car Accident : आमदार सुनील टिंगरे यांनी अग्रवाल यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पुणे:

प्रतीक्षा पारखी, प्रतिनिधी


पुण्यात  दारु पिऊन पोर्शे कार चालवलेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. ही कार चालवणारा तरुण हा अल्पवयीन होता. या प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मिळाला. आरोपी तरुणाला जामीन मिळाल्यानंतर पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे चर्चेत आले आहेत. टिंगरे यांनी या प्रकरणात दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेवर टिंगरे यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अग्रवाल यांच्याशी काय संबंध?

या कार अपघातानंतर गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर जाणीवपूर्वक माझं नाव घेतलं जात आहे.  अपघात झाला त्या रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी मला पीएचा मतदारसंघातल्या कल्याणीनगर भागात  मोठा अपघात झाला आहे, हे सांगण्यासाठी फोन आला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. त्याचवेळी विशाल अग्रवाल यांचाही मुलाच्या कारला अपघात झाला आहे, हे सांगण्यासाठी फोन आला. मुलाला जमावाकडून मारहाण झाली असून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलंय, असं अगरवाल यांनी सांगितलं. त्यांनी पोलीस स्टेशनला येण्याची विनंती केली.

मी सर्वप्रथम घटनास्थळी गेलो. तेथील सर्वजण पोलीस स्टेशनला गेले होते. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांशी देखील बोललो. मी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं. मी नेहमीच पब आणि बार मालकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असं टिंगरे यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड )
 

मी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी अग्रवाल यांच्याकडं काम केलं आहे, माझा आणि त्यांचा इतकाच संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांनाही मी मदत केली, असं टिंगरे यांनी स्पष्ट केलंय. पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज उघड करावं अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

दबाव टाकत असेल तर कारवाई करा - फडणवीस

दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केलीय.  पुण्यातील अपघाताची घटना गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांकडं सर्व पुरावे आहेत. पोलिसांनी आरोपीवर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वय 17 वर्ष 8 महिने आहे. निर्भया प्रकरणानंतर कायदे बदलले आहेत. या प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींना सज्ञान मानावं अशी पोलिसांची भूमिका आहे.

( नक्की वाचा : कोर्टाच्या निर्णयाचा पोलिसांनाही धक्का, अल्पवयीन मुलाच्या जामीनावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य )
 

याबाबत बाल न्यायालयानं वेगळी भूमिका घेतली होती. त्यांनं अल्पवयीन आरोपीला 15 दिवस सामाजिक काम करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर लोकांमध्ये संताप वाढला. कोर्टाच्या या निर्णयाचा पोलिसांनाही धक्का बसला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात कुणी दबाव टाकत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Topics mentioned in this article