Pune Rain Today : पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग! चारही धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Pune rain Update : लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अखेर भुशी धरण 100 टक्के भरले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : रविवारी रात्रीपासून पुणे आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. काही तासात पडलेल्या पावसाने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चारही धरणांचा पाणीसाठ ५.४५ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चारही धरणात गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.  

(नक्की वाचा-  Rain Update : मुंबईसह उपनगरात आजही पावसाची रिपरिप, कोकणातील एका जिल्ह्यात अतिवृष्टी; विदर्भातील स्थिती काय आहे?)

भुशी डॅमही ओव्हरफ्लो

लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अखेर भुशी धरण 100 टक्के भरले आहे. दरवर्षी पर्यटकांना भुशी धरण भरण्याची आतुरता असते. यावर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. लोणावळ्यामध्ये देखील गेल्या 24 तासात 123 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

(नक्की वाचा- Indrayani River Bridge Collapse: अजित पवार असंवेदनशील? लोकांचा जीव गेला, पालकमंत्री कारखाना निवडणुकीत व्यस्त)

पुण्यातील पावसाची मागील 24 तासातील आकडेवारी 

लोणावळा - १२३ मिमी
गिरीवन - ८४ मिमी
भोर - ८० मिमी
एनडीए - ४६.५ मिमी
लव्हाळे - ४४ मिमी
पाषाण - ४२.५ मिमी
तळेगाव - ३२.५ मिमी
शिवाजीनगर - ३०.५ मिमी
चिंचवड - २८ मिमी
मगरपट्टा - २७.५ मिमी
हडपसर - २५ मिमी
हवेली - २०.५ मिमी
राजगुरूनगर-  १६ मिमी
माळीण- १३.५ मिमी
निमगिरी- १२ मिमी
पुरंदर - ८.५ मिमी
दापोडी- ८.५ मिमी
नारायणगाव - ४.५ मिमी
बारामती - २.५ मिमी

Advertisement
Topics mentioned in this article