Pune News: सह्याद्री हॉस्पिटल उभारणाऱ्या चारुदत्त आपटेंची खळबळजनक ऑडियो क्लिप

रुग्णसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत हे हॉस्पिटल उभारणाऱ्या चारूदत्त आपटेंची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sahyadri Hospital Acquisition: सह्याद्री हॉस्पिटल साखळी समूहासाठी 6400 कोटींचा सौदा झालाय. (फोटो सौजन्य- Gemini AI)
मुंबई:

Sahyadri Hospital Acquisition: सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital Pune) साखळी विकत घेण्याचा मणिपाल हॉस्पिटलने (Manipal Hospital) निर्णय घेतला असून हा सौदा 6400 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा भारतातील अशा प्रकारच्या मोठ्या सौद्यांपैकी एक असल्याचाही दावा करण्यात येत आहे. मात्र हा सौदा करत असताना काही गोष्टींचे बिनधास्तपणे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत असून या नियमभंगाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने हे हॉस्पिटल सुरू करणाऱ्या कोकण मित्र मंडळाला धर्मादाय वापरासाठी नाममात्र दरात दीर्घकालासाठी जमीन दिली होती. या जमिनीवर सह्याद्री हॉस्पिटल उभे राहिले आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल, जमीन कोणत्याही परिस्थितीत ना भाड्याने देता येऊ शकते ना विकता येऊ शकते. तरीही हे हॉस्पीटल विक्रीसाठी कसे काय उपलब्ध करण्यात आले असा सवाल सजग पुणेकरांनी केला. 

( नक्की वाचा: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )

चारुदत्त आपटेंचे म्हणणे काय आहे ?

एक ध्येय डोळ्यासमोर ठेवत हे हॉस्पिटल उभारणाऱ्या चारूदत्त आपटेंची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "विस्तारीकरण होत असताना मला माहिती होतं की गुंतवणूकदारांचे वर्चस्व असेल." सध्या सह्याद्री हॉस्पिटलची मालकी ही ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्ड अर्थात ओटीटीपीकडे (Ontario Teachers' Pension Plan ) आहे. ओटीपीपी या हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्यात सपशेल फेल ठरल्याचे आपटेंचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटलंय की. "मी पायउतार झालो तेव्हा EBITDA (व्याज, कर आणि घसाऱ्यापूर्वीची कमाई) हा  152 कोटी होता. त्यानंतर ओटीपीपीने चार्जेस तिप्पट केले तरीही त्यांचा EBITDA  फक्त 5 टक्के वाढला." याचा अर्थ असा की ओटीपीपीने सह्याद्रीचे व्यवस्थापन हाती घेतल्यापासून त्यांनी रुग्णांकडून जास्त रक्कम वसूल करण्यास सुरूवात केली मात्र तरीही त्यांना फायदा होताना दिसत नाहीये. 

Advertisement

( नक्की वाचा: महापालिकेने भाड्याने दिलेली जागा सह्याद्री हॉस्पिटलने विकली? )

सह्याद्री काहीही करून विकत घ्यायचा प्रयत्न कशासाठी?

आपटे यांनी पुढे म्हटले की, " मणिपाल हॉस्पिटल आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची हॉस्पिटल पुण्यातच आहेत. त्यांचं स्वत:चं हॉस्पिटल बाणेरमध्ये आहे दुसरं खराडीला आहे. ही हॉस्पिटल झालेला खर्चही भरून काढू शकत नाहीयेत.  आयपीओची किंमत खाली येईल यामुळे सह्याद्री वाटेल त्या परिस्थितीत खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मणिपाल हॉस्पीटल ही पै कुटुंबाने सुरू केली होती. त्यांचा हिस्सा आता नगण्य आहे. सह्याद्रीची मालकी ओटीटीपीकडे आहे. मणिपालची मालकी टेमॅसेककडे आहे. या व्यवहारासाठी अकल्पनीय अशी किंमत ठरवलीय मात्र या व्यवहारात एक अट घालण्यात आली आहे. ही अट अशी आहे की सह्याद्री हॉस्पिटलचा EBITDA 250 कोटी असावा, तो होणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे ही किंमत 6000 पर्यंत खाली येईल अशी अपेक्षा आहे." 

Advertisement

तीन विभागांकडून चौकशी, व्यवहाराचे पुढे काय होणार ?

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी या सगळ्या प्रकरणात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलंय की, " पुणे महापालिकेने कोकण मित्र मंडळ ट्रस्टला 99 वर्षांच्या कराराने जागा दिली होती. त्यासाठीच्या अटी शर्तींचे पालन होत नाहीये. धर्मादाय रुग्णालय कॉर्पॉरेट सेक्टरच्या ताब्यात देण्याचा नवा राजमार्ग या व्यवहाराच्या निमित्ताने झाला. धर्मादाय आयुक्त, महापालिका, स्टँप ड्युटी विभागाकडून या व्यवहाराची चौकशी सुरू आहे." 

Advertisement