विशाल अगरवाल व त्याच्या पत्नीसह इतर 5 जणांना कोर्टाने आणखी एक दणका दिला आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील त्यांचा मुक्काम वाढणार आहे. या सर्व आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे कारागृहा बाहेर येण्याचे या आरोपींचे स्वप्न भंगले आहे. त्यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढणार आहे. या सर्वांचा जामीन फेटाळला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात कल्याणीनगर इथे पोर्शे कारने एका अल्पवयीन आरोपीने दोघांना उडवले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणातून सुटण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी अनेक क्लृप्त्या करून पाहील्या पण त्या उघड झाल्या. अखेर ते कारागृहात पोहोचले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ससून रुग्णालयातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणे हा गंभीर गुन्हा आहे. त्याचे सबळ पुरावे सरकारी पक्षाकडून देण्यात आले होते .अशी माहिती विशेष सरकारी वकील ॲड शिशिर हिरे यांनी दिली. सरकारी पक्षाचे हे पुरावे न्यायालयानेही ग्राह्य धरले आहे. यानंतर पुणे सत्र न्यायालयाने विशाल अगरवालसह 6 जणांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. अशा पद्धतीने अगरवाल याला आणखी एक धक्का मिळाला आहे.
कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्याची प्रक्रिया 2024 च्या अपघाताच्या दिवशी, म्हणजेच 30 जून 2024 रोजी ससून रुग्णालयात झाली. अपघातानंतर, अल्पवयीन चालकासह त्याच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी घेतले गेले. पण, त्यावेळी त्यांच्या रक्ताचे नमुने न देता इतर तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. या बदलाची प्रक्रिया डॉ. अजय तावरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
रक्ताचे नमुने बदलल्यानंतर गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते. रक्ताचे नमुने बदलणे हा मोठा गुन्हा असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात आरोपींवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आरोपी सध्या कारागृहात आहेत. जामीन मिळावा म्हणून या सर्व आरोपींचा प्रयत्न आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अगरवाल पती-पत्नी, ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर आरोपींवरही या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तीन ते दहा वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे. रक्ताचे नमुने बदलल्याने अपघाताच्या तपासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.