Pune Shocking: श्वानावर नराधमाचा अत्याचार, CCTV मुळे उघड झाली घटना, प्राणीप्रेमींमध्ये संताप

या अत्याचार प्रकरणानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. त्यांनी गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिलां आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे मुली सुरक्षित नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. अशा वेळी आता प्राणी तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांनाच विचार करायला लावणारी आणि तेवढीच हादरवून सोडणारी घटना  पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. शहरातील रावेत परिसरामध्ये चक्क एका मादी श्वानावर अत्याचार करण्यात आले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ज्यावेळी हा सीसीटीव्ही पाहीला गेला त्यावेळी ही धक्कादायक घटना उघड झाली. 

ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर प्राणीप्रेमी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याला आता शोधले जात आहे. अत्याचार केल्यानंतर तो फरार झाला आहे. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 मे 2026 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: पावभाजीमध्ये सापडला जिवंत किडा! हिंजवडीच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार Video Viral

शहरातील रावेत येथील डेस्टिनेशन कॅफे आणि बालाजी हॉटेल जवळ एक इसम संशयास्पद पणे फिरत होता. शिवाय तो अर्धनग्न होता. त्या स्थितीत तो अश्लील चाळे करताना ही काही जणांनी त्याला पाहीले. त्यानंतर साधारण 10.34 च्या सुमारास त्याने तेथील एका मादी श्वानाला पकडले. आजूबाजूला कोणी नाही याचा त्याने अंदाज घेतली. तिला पकडले. त्यानंतर  तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा सर्व धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नक्की वाचा - IAS-IPS Love Story: वयाने मोठ्या महिला IPS च्या प्रेमात पडले IAS अधिकारी, अनोख्या प्रेमाची जबरदस्त कहाणी

ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली. त्यानंतर एका प्राणीप्रेमीने या विरोधात तक्रार दाखलकेली. तक्रारीवरून आरोपी राजेंद्र रघुनाथ शाहू या 35 वर्षाच्या आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा आरोपी मुळचा ओडिशाचा आहे. याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्याचार प्रकरणानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. त्यांनी गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्याल कडक शिक्षा करण्याची मागणी ही केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आदमाने करत आहेत.