- तुषार सिंगला आणि नवजोत सिमी यांची प्रेमकथा UPSC कोचिंग सेंटरमध्ये सुरू झाली आणि पुढे लग्नात रूपांतरित झाली
- या जोडप्याने वयाच्या अंतराला आणि समाजाच्या रूढीवादी विचारांना नकार देत प्रेमाचा नवा आदर्श सादर केला आहे
- नवजोत IPS अधिकारी असून तुषार IAS अधिकारी आहेत आणि नवजोत वयाने तुषारपेक्षा जवळपास दोन अर्ध वर्षांनी मोठी आहे
Inspiring Love Story: युपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. या खडतर प्रवासात अनेकांना केवळ करिअरच नाही, तर त्यांचा लाइफ पार्टनरही मिळतो. अशीच एक रंजक आणि प्रेरणादायी प्रेमकथा समोर आली आहे. ही कहाणी आहे IAS तुषार सिंगला आणि IPS नवजोत सिमी यांची. या जोडप्याने वयाच्या अंतराची आणि समाजाच्या जुन्या रूढीवादी विचारांची बंधनं झुगारून प्रेमाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. वयाने मोठ्या असलेल्या महिला आयपीएस बरोबर आयएएस असलेल्या तुषार यांनी विवाह केला. त्यांची लव्ह स्टोरी ही भन्नाट आहे.
या दोघांची लव्ह स्टोरी कोचिंग सेंटरपासून सुरू झाली. मूळचे पंजाबचे असलेले तुषार आणि नवजोत दिल्लीत एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये युपीएससीची तयारी करत होते. एकाच राज्यातील असल्यामुळे त्यांच्यात लवकर संवाद सुरू झाला. त्यानंतर आपोआप भेटीगाठी वाढल्या. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याच वेळी या दोघांनी आपण लग्न करायचं हे निश्चित केलं होतं. पण त्यावेळी त्यांनी आपल्या स्पर्धा परिक्षेकडे जास्त लक्ष दिले. शेवटी मेहनतीने त्यांनी UPSC परिक्षा क्रॅक केली.
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या राज्यात पोस्टिंग मिळाली. नवजोत सिमी यांना बिहार कॅडर मिळाले. तर तुषार सिंगला यांना पश्चिम बंगाल कॅडर देण्यात आले. मात्र, या अंतरामुळे त्यांच्या प्रेमात दुरावा आला नाही. बिहारची राजधानी पाटणा येथील एका रेस्टॉरंटमध्ये दोघे पहिल्यांदा डेटवर गेले होते. जिथे त्यांच्या नात्याला अधिक घट्टपणा आला. त्यानंतर 14 February 2020 रोजी, व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तुषार सिंगला यांच्या हावडा येथील कार्यालयात दोघांनी अत्यंत साधेपणाने कोर्ट मॅरेज केले.
या लग्नाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे IPS नवजोत सिमी या पती IAS तुषार सिंगला यांच्यापेक्षा वयाने जवळपास 2.5 वर्षे मोठ्या आहेत. आपल्या समाजात सहसा पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा, हा अलिखित नियम मानला जातो. मात्र, परस्पर समंजसपणा आणि आदर असेल तर वयाचे अंतर महत्त्वाचे ठरत नाही, हे या दाम्पत्याने सिद्ध केले आहे. पंजाबच्या गुरुदासपूरच्या राहणाऱ्या नवजोत सिमी यांनी लुधियानामधून BDS चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरी पेशा स्वीकारला होता. मात्र, त्यांचे ध्येय वेगळे होते. त्यांनी डॉक्टरी सोडून युपीएससीची तयारी केली आणि 2017 मध्ये 735 वी रँक मिळवून त्या आयपीएस बनल्या. दुसरीकडे, तुषार सिंगला यांनी IIT Delhi मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग केले. JNU मधून पुढील शिक्षण घेतले. 2014 मध्ये आपल्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया 86 वी रँक मिळवत आयएएस पद पटकावले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world