राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपी आणि सरकारी वकिलांना देखील अनेक दावे केले आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेचा प्रेमविवाह झाला होता. मात्र असं असतानाही तो समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमावायचा अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते.
दत्ता गाडेचा भाऊ शेती करतो. आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत असे. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
वर्षभराच्या डेटाचे केले पोलिसांनी विश्लेषण
आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरलेला आहे, त्याने कुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलीस पथके पाठवण्याची तयारी केली होती.
(नक्की वाचा - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?)
दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे देखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्याचे मित्र, नातेवाइकांची मुक्काम ठिकाणे देखील पोलिसांनी शोधून काढली होती.