रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Traffic Alert : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. 6 सप्टेंबर, 2025 रोजी गणेश विसर्जन होणार असून, यासाठी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागात अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, काही ठिकाणी 'नो एंट्री' आणि 'नो पार्किंग' जाहीर करण्यात आले आहे. शहरातील वाहतुकीचे हे नियोजन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी करण्यात आले आहे.
गणेश विसर्जनासाठी बंद असलेले प्रमुख रस्ते
गणेश विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता सुरू होणार असून, मिरवणूक संपेपर्यंत (7 सप्टेंबरपर्यंत) खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.
शिवाजी रोड: काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक (सकाळी 7:00 पासून)
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 7:00 पासून)
बाजीराव रोड: सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12:00 पासून)
कुमठेकर रोड: टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12:00 पासून)
गणेश रोड: दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10:00 पासून)
केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10:00 पासून)
टिळक रोड: जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9:00 पासून)
शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका (दुपारी 12:00 पासून)
जंगली महाराज रोड: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
कर्वे रस्ता: नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
फर्ग्युसन रोड: खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट (सायं. 4:00 पासून)
भांडारकर रस्ता: पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक (सायं. 4:00 पासून)
पुणे-सातारा रोड: व्होल्गा चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
सोलापूर रोड: सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
प्रभात रोड: डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक (सायं. 4:00 पासून)
बगाडे रोड: सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी 9:00 पासून)
गुरू नानक रोड: देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी 9:00 पासून)
( नक्की वाचा : Pune News : पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; मानाच्या गणपतींच्या वेळापत्रकासह नियमावली जाहीर )
वाहतूक वळवण्याचे (Diversion) प्रमुख ठिकाण
मिरवणूक सुरू झाल्यानंतर आवश्यकतेनुसार खालील ठिकाणी वाहतूक वळवण्यात येईल
झाशी राणी चौक (जंगली महाराज रोड)
काकासाहेब गाडगीळ पुतळा (शिवाजी रोड)
अपोलो टॉकीज / दारुवाला पूल (मुदलीयार रोड)
संत कबीर पोलीस चौकी (लक्ष्मी रोड)
सेव्हन लव्हज चौक (सोलापूर रोड)
व्होल्गा चौक (सातारा रोड)
सावरकर पुतळा चौक (बाजीराव रोड)
सेनादत्त पोलीस चौकी (लाल बहादुर शास्त्री रोड)
नळस्टॉप (कर्वे रोड)
गुडलक चौक (फर्ग्युसन कॉलेज रोड)
( नक्की वाचा : Pune Ganpati: पुण्यात घ्या 3 सोंडेच्या बाप्पाचे दर्शन; वाचा मंदिर दर्शनाच्या वेळा आणि प्रवासाची माहिती )
कुठे करणार पार्किंग?
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पार्किंगची सोय खालील ठिकाणी उपलब्ध असेल:
शिवाजी आखाडा वाहनतळ (दुचाकी/चारचाकी)
निलायम टॉकीज (दुचाकी)
एआयएसएसपीएमएस मैदान (दुचाकी/चारचाकी)
संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान (दुचाकी/चारचाकी)
एसपी कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
फर्ग्युसन कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
पेशवे पार्क, सारसबाग (दुचाकी)
जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान (दुचाकी/चारचाकी)
पाटील प्लाझा पार्किंग (दुचाकी)
मराठवाडा कॉलेज (दुचाकी)
दांडेकर पूल ते गणेशमळा (दुचाकी)
नदी पात्र - भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी/चारचाकी)
गणेशमळा ते राजाराम पूल (दुचाकी)
48 तास जड वाहनांना प्रवेशबंदी
6 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 12:01 पासून 7 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 12:00 पर्यंत, पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी असेल.
अन्य परिसरातील वाहतूक बदल
धायरी फाटा, केशवनगर, मुंढवा आणि ससाणे नगर, हडपसर परिसरातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत.
धायरी फाटा चौक-नांदेड फाटा-उंबऱ्या गणपती चौक
6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:00 ते रात्री 12:00 पर्यंत धायरी फाटा येथून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल.
पर्यायी मार्ग: स्वारगेटवरून येणारी वाहने धायरी उड्डाणपुलावरून राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिट चौक, कॅनॉल पूल ओलांडून डावीकडे वळण घेऊन पुढे जाऊ शकतात.
केशवनगर, मुंढवा
एकेरी मार्ग (6 सप्टेंबर, सकाळी 6:00 पासून):
छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्यांनी मांजरी रोडऐवजी रेणुका माता मंदिराकडून उजवीकडे वळून जावे.
गायरान वस्तीतून मुंढवा चौकाकडे येणाऱ्यांनी रेणुका माता मंदिरातून डावीकडे वळून व्यंकटेश ग्राफिक्सवरून उजवीकडे वळून मुंढवा चौकाकडे जावे.
ससाणेनगर, हडपसर
काळेपडळ अंडरपास: ससाणेनगर मेन रोडकडे येणारी वाहतूक बंद.
पर्यायी मार्ग: रवी पार्क रोडने हांडेवाडी रोडकडे वळून, नंतर ससाणेनगर अंडरपासमार्गे इच्छित स्थळी जावे.
न्यू इंग्लिश स्कूल डी. पी. रोड: ससाणेनगर अंडरपासवरून ससाणेनगर मेनरोडकडे येण्यास बंदी.
पर्यायी मार्ग: ससाणेनगर अंडरपासमार्गे सैय्यदनगर, हांडेवाडी रोड किंवा वैदुवाडी/रामटेकडीमार्गे इच्छित स्थळी जावे.
नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.