पुणेकरांची चिंता वाढली, नव्या 9 झिका रुग्णांची नोंद; आकडा 15 वर

Pune Zika virus : धोकादायक बाब म्हणजे झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

गेल्या 15 दिवसांपासून पु्ण्यात झिका रूग्णसंख्येत वाढ होत आहे. आता मात्र एका दिवसात 9 झिका रूग्णांची भर पडली आहे. यात दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण संसर्गाची संख्या 15 वर पोहोचली आहे.  
  
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत चाचणीसाठी एकूण 109 नमुने पाठवण्यात आले  आहेत. पुणे महानगरपालिकेने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बाधित महिलांपैकी एक सिंहगड रोड परिसरात राहते. सध्या ती 12  आठवड्यांची गरोदर आहे. येरवडा येथे राहणारी दुसरी महिला 7 आठवड्यांची गरोदर आहे.

आतापर्यंत आलेल्या झिका रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आलेली नाहीत. मात्र गर्भवती महिलांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

नक्की वाचा - सावधान! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, डॉक्टरसह मुलीलाही संसर्ग

झिका व्हायरसची लागण होण्यामागील कारण...

- झिका व्हायरस हा एडीस एजिप्टी आणि एडीस अल्बोपिक्टस नावाचा डास चावल्यामुळे पसरतो. हा विषाणूजन्स रोग आहे. विशेषत: संक्रमित एडिस प्रजातीचा डास चावल्याने झिका पसरतो.

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत? 

- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.

- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -14 मध्ये निदर्शनास येतात. 

- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. 

- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.