राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र म्हणजेच (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली होती. ते हटविण्याचे काम सुरु करण्यात आले होते. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने ही माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात मागील 24 तासांमध्ये 22 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 19.8 मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 16.3 मिमी, चंद्रपूर 12.3 मिमी, ठाणे जिल्ह्यात 11.1 मिमी आणि रायगड जिल्ह्यात 9.4 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाटात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात कालपासून शनिवारी आणि आज 22 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. ही सर्व आकडे मिलिमीटरमध्ये आहे. ठाणे 11.1, रायगड 9.4, रत्नागिरी 16.3, सिंधुदुर्ग 8.5, पालघर 19.8, नाशिक 5.4, धुळे 0.2, नंदुरबार 4.8, जळगाव 2.6, अहिल्यानगर 0.3, पुणे 3.4, सोलापूर 0.4, सातारा 5.2, सांगली 2.7, कोल्हापूर 5.1, छत्रपती संभाजीनगर 0.7 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
ट्रेंडिग बातमी - Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा
त्याच बरोबर जालना 0.6, लातूर 0.8, धाराशिव 1.5, नांदेड 2.4, परभणी 0.3, हिंगोली 3.8, बुलढाणा 3, अकोला 1.4, वाशिम 1.4 अमरावती 1.1, यवतमाळ 9.3, वर्धा 4.2, नागपूर 1.4, भंडारा 3.8, गोंदिया 2.2, चंद्रपूर 12.3 आणि गडचिरोली जिल्ह्यात 6.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.