गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण ही आहे. पुढील चार ते पाच दिवसात असचं वातावरण राहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहाणार आहे. गुजरातमध्ये आलेल्या चक्रीय स्थिती मुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याचा असर आणखी चार ते पाच दिवस दिसणार आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी पाऊस होण्याचीही दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पाऊस होवू शकतो. हा अवकाळी पाऊस असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सूनचा विचार करालचा झाल्यास भारतीय हवामान खात्याने 13 मे दरम्यान मान्सून अंदमानमध्ये पोहोचेल असं सांगितलं आहे.
त्यानंतर मान्सून हा केरळकडे सरकतो. दर वर्षीचा विचार करता केरळमध्ये मान्सून एक तारखेच्या आसपास पोहोचतो. पण यावर्षी तो किती तारखे पर्यंत येईल हे आताच सांगणे अवघड आहे. याबाबतचा अंदाज 15 मे पर्यंत करता येईल असं ही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकर मान्सून यावा असं प्रत्येकालाच वाटत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
दरम्यान तीन ते चार दिवस गुजरातमध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गुजरातमध्ये अतिवृष्टी बरोबरच गारपीट आणि सोसाट्याचा वारा झाला. त्याचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही दिसला. या जिल्ह्यातही पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्रात ही त्यामुळे काही ठिकाणी पाऊस झाला. त्यात पुणे, बारामती राजगुरूनगर, जुन्नर याचा समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर आणि साताऱ्यात गारपिट आणि पाऊस झाला आहे. विदर्भात ही पाऊस झाला आहे.
काल आणि परवा कोकणात पाऊस दिसून आला आहे. पुण्यात काही ठिकाणी पाऊस दिसून आलाय. वातावरण बदल झालेला दिसतोय. त्यामुळे ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पुणे परिसरात आले आहेत. त्यामुळे इथं ढगाळ वातावरण आहे. पुढीत तीन चार दिवस हे वातावरण असेच असेल, असं डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कुठेही पाऊस होणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.