जाहिरात

S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र’ काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ

प्रत्येक एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 वाहने असतात. ज्यात प्रक्षेपक, रडार, नियंत्रण केंद्रे आणि सहाय्यक वाहनांचा समावेश असतो. हे 600 किमी पर्यंतच्या हवाई हल्ल्याचा मागोवा घेऊ शकते.

S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र’ काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ
नवी दिल्ली:

‘ऑपरेशन सिंदूर'मुळे बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतावर हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. त्यासाठी 15 शहरांना टार्गेट बनवलं गेलं होतं. यात भारताच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचाही समावेश होता. पण भारताच्या हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली एस-400 एसएएमने पाकिस्तानच्या या खटाटोपावर पाणी फेरले. काल रात्री पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. भारताच्या दिशेने येणारे पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आले. पाकिस्तानच्या कोणत्याही अशा प्रकारच्या कृत्याला रोखण्यासाठी भारताच्या सीमेवर ‘सुदर्शन चक्र' सज्ज उभे आहे. भारताकडे रशियाकडून मिळालेली लांब पल्ल्याची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली एस-400 एसएएम (सरफेस टू एअर मिसाइल) आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी सीमेवर सुदर्शन तैनात आहे. भगवान कृष्णाच्या शक्तिशाली सुदर्शन चक्राच्या धर्तीवर भारतीय हवाई दलाने याला सुदर्शन असे नाव दिले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी बुधवारी रात्री भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. या शहरांवर पाकिस्तान क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने हल्ला करणार होता. भारताच्या सुरक्षा कवचाने म्हणजेच सुदर्शनने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्याचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली गेली. भारताने गुरुवारी सकाळी पाकिस्तानला लाहोरमध्ये जाऊन याचे प्रत्युत्तर दिला. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट करण्यात आली.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: पाकचा डाव उधळला! भारताने पाकिस्तानचे रडार सिस्टीम केली उद्धवस्त

चला तर मग जाणून घेऊया एस- 400 एसएएम  खास का आहे. पाकिस्तानकडे असलेल्या चीनच्या हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली एचक्यू-9 पेक्षा हे का चांगले आहे? सर्वात आधी हे जाणून घ्या की हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली काय असते. एस-400 एसएएम ही देखील एक प्रकारची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली आहे. हे लांब पल्ल्याचे सरफेस टू एअर प्रकारचे सिस्टम आहे. म्हणजेच हे सिस्टम स्वतः जमिनीवर तैनात असते. तिथूनच क्षेपणास्त्र डागून शत्रूचे रॉकेट-क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करते. तेवढी त्याची ताकद असते. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा? आकडा आला समोर

एस-400 एसएएम रशियाच्या अल्माज सेंट्रल डिझाइन ब्युरोने 1980 च्या दशकात विकसित केले. खरं तर, त्या वेळी पाश्चात्त्य देशांकडे एमआयएम- 104 पॅट्रियटसारखी हवाई सुरक्षा प्रणाली होती. तिचा मुकाबला करण्यासाठी रशियाने हे अस्त्र तयार केले. याचा उद्देश 1960-70 च्या दशकात बनलेल्या एस-200 आणि एस-300 सिस्टमची जागा घेणे हा होता. हेच भारतानेही आपल्यासाठी खरेदी केले आहे. दोन्ही देशांमध्ये पाच एस-400 साठी 35,000 कोटी रुपयांचा करार झाला. त्यावर 2018 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. यापैकी तीन एस-400 स्क्वाड्रन यापूर्वीच तैनात केले गेले आहेत. चौथा या वर्षाच्या अखेरीस येईल.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor भारताच्या 'या' 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न निष्पळ, वाचा कुठं होणार होता हल्ला

प्रत्येक एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 वाहने असतात. ज्यात प्रक्षेपक, रडार, नियंत्रण केंद्रे आणि सहाय्यक वाहनांचा समावेश असतो. हे 600 किमी पर्यंतच्या हवाई हल्ल्याचा मागोवा घेऊ शकते. एस-400 चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर करते. जे 400 किमी पर्यंतच्या अंतरावर लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहेत. हे लढाऊ विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखू शकते. त्यामुळे ते भारताच्या संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही", केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानने आपल्या हवाई संरक्षणासाठी चीनकडून एचक्यू-9 खरेदी केले आहे. आता याची कमतरता ही आहे की खुद्द चीनने आपले एचक्यू-9 रशियाच्या एस-300 हवाई सुरक्षा प्रणालीवर आधारित बनवले आहे. एस-300 स्वतः एस-400 पेक्षा एक स्तर खालची हवाई सुरक्षा प्रणाली आहे. तेव्हा एचक्यू-9 भारताकडे असलेल्या एस-400 समोर कमजोर ठरते. एचक्यू-9 मध्ये 200 किमीची रडार डिटेक्शन रेंज आहे. ती मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी अनुकूल आहे. परंतु एस-400 च्या तुलनेत याची डिटेक्शन रेंज कमी आहे. ते केवळ क्षेपणास्त्रांसारख्या मर्यादित विमानांनाच रोखू शकते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com