Rain News: आता पाऊस पुन्हा कधी पडणार? दमदार नाही तर मुसळधार होणार! हवामान खात्याचा अंदाज आला

दरम्यान पहिल्या चार पाच दिवसात दमदार पाऊस झाला आहे. कोकण, पुणे, मराठवाड्यात पाऊस झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सलग चार पाच दिवस राज्याला पावसाने झोडपले होते. पण त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. जरी वातावरण ढगाळ असले तरी पाऊस काही पडत नाही. गेलो दोन तिन दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाऊस परत कधी येणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार हवामान खात्याने काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस होणार आहे. यावर्ष पाऊसाची स्थिती थोडी वेगळी आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस होणार आहे असं हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. 

'अल निनो'चा फटका यावेळी मान्सूनला बसला आहे. मान्सूनचे आगमन ही यामुळे उशिराने झाले. पण 1 ते 9 तारखे दरम्यान मुसळधार पाऊस बरसला. तज्ज्ञांनी अजून एक अंदाज वर्तवला आहे. तो भारतीय समुद्री स्थिरांकावर आधारित आहे. आयओडी म्हणजेच भारतीय समुद्री स्थिरांक हा महत्त्वाचा घटक 'अल निनो'चा प्रभाव कमी करू शकतो. त्यामुळे भारतीय उपखंडात पाऊस होऊ शकतो.असा अंदाज अनेक हवामान विभागाने दिला आहे. हा 'आयओडी' जुलैअखेर पर्यंत काही प्रमाणात, तर ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची दाट  शक्यता आहे. त्यामुळे जुलै अखेर पर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे. 

नक्की वाचा - Vinayak Raut: केस कापले, गोमुत्र प्यायला दिले! बुवा- बाबांच्या जाळ्यात विनायक राऊतांची सून? गंभीर आरोप

हवेचा दाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाऊस कमी होत आहे. मात्र हा दाब ज्यावेळी कमी होईल त्यावेळी पाऊस होवू शकतो असं ही सांगण्यात आलं आहे. सध्या भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थ आहे. तो  जुलैच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 22 ते 31 जुलै या कालावधीत दमदार पावसाची शक्यता आहे. तर'आयओडी' ऑगस्टच्या सुरुवातीपासून जोरदार सक्रिय होणार आहे. त्यामुळे या महिन्यात ही उत्तम पाऊस आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस होईल. कमी वेळात जास्त पाऊस अशीच स्थित या  वर्षीच्या मान्सूनची राहाणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: माऊलींच्या पालखी सोहळ्यात अजितदादांची एन्ट्री! एकच वादाची घोषणा अन् सेल्फीसाठी गर्दी, प्रकार काय

दरम्यान पहिल्या चार पाच दिवसात दमदार पाऊस झाला आहे. कोकण, पुणे, मराठवाड्यात पाऊस झाला आहे. तर विदर्भातही काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरूवात केली आहे. पेरणी झाल्यानंतर चांगला पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतीला फायदा होवू शकतो. दुसरीकडे राज्यातील अनेक धरणं अजून ही भरलेली नाहीत. त्यामुळे परत पाऊस आल्यास ही धरणं भरण्यास ही मदत होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.