प्रतिकात्मक फोटो
राज्यातील अनेक भागात पाऊस धो-धो बरसत असताना मराठवाड्यात मात्र अजूनही अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 55 दिवसांत 55.9 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात वार्षिक सरासरी 679.5 मिमी पाऊस पडतो. या तुलनेत आजवर 380.1 मिमी पाऊस मराठवाडा विभागात झाला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पावसाचं प्रमाण कमी असल्याने मराठवाड्यात अजूनही चांगल्या पावसाची वाट शेतकरी पाहत आहे. शेतकऱ्यांची अनेक शेतीची कामे खोळबंली आहे. तर अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. दरम्यान मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला आहे ते ही पाहुयात.
मराठवाड्यातील पावसाची टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर : 59.2 टक्के
जालना : 57.4 टक्के
बीड : 66.8 टक्के
लातूर : 61.2 टक्के
धाराशिव : 65.5 टक्के
नांदेड : 49.2 टक्के
परभणी : 48.7 टक्के
हिंगोली : 47.00 टक्के
एकूण : 55.9 टक्के