विशाल पाटील, मुंबई
मागील दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. अखेर आज मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर , माहीम , वरळी , बांद्रा परिसरात जोरदार पाऊस बरसला. मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांचा शनिवार सकाळी पळापळा झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार आज पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
(नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव)
राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज
राज्यातही आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठाणे , पालघर, रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे , पुणे घाट , साताऱ्याला ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर आहिल्यानगर , नाशिकला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Navi Mumbai Crime : 15 वर्षीय मुलाचे अपहरण, 12 लाखांची मागणी; पोलिसांनी सूत्रं हालवली अन्...)
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब कोसळून नुकसान होणे आणि वीज प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.