Rajesh Exports Scam: 15 लाख कोटींचा घोटाळा, LIC ला सुद्धा कोट्यवधींचा फटका! 'गोल्ड किंग'ला SEBI ने केलं कंगाल

भारतीय शेअर बाजारात सध्याच्या घडीला 'राजेश एक्स्पोर्ट्स' (Rajesh Exports) आणि कंपनीचे प्रमोटर (Promoter) राजेश मेहता (Rajesh Mehta) यांचे नाव खूप चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Who Is Rajesh Mehta

Who is Rajesh Mehta Rajesh Exports : भारतीय शेअर बाजारात सध्याच्या घडीला 'राजेश एक्स्पोर्ट्स' (Rajesh Exports) आणि कंपनीचे प्रमोटर (Promoter) राजेश मेहता (Rajesh Mehta) यांचे नाव खूप चर्चेत आहे. भांडवली बाजार नियामक 'सेबी'ने (SEBI) एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजेश मेहता यांच्यावर शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर (Trading) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सेबीच्या प्राथमिक तपासानुसार,राजेश एक्स्पोर्ट्सने त्यांच्या एकूण उत्पन्नातील तब्बल 97% ते 99% हिस्सा खोट्या पद्धतीने दाखवल्याचं समोर आलं आहे. सेबीने त्यांच्या 109 पानांच्या अंतरिम आदेशात या गैरव्यवहाराचे वर्णन 'इतिहासातील सर्वात गंभीर वित्तीय अनियमिततांपैकी एक'असे केले आहे. सेबीच्या या धडक कारवाईनंतर कंपनीचे शेअर्स कोसळले आहेतच,पण देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीला (LIC) देखील याचा मोठा फटका बसला आहे.

कोण आहेत राजेश मेहता? 

​बंगळुरूचे रहिवासी असलेले ६० वर्षीय राजेश जे.मेहता हे राजेश एक्स्पोर्ट्सचे संस्थापक आणि चेअरपर्सन आहेत.त्यांनी 1989 मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या सोने रिफायनिंग आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समाविष्ट केली. राजेश मेहता यांनी अत्यंत कमी वयात या व्यवसायात एन्ट्री केली होती. त्यांनी कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून सुरुवातीला चांदीचा व्यापार सुरू केला आणि त्यानंतर हळूहळू ते सोने आणि दागिन्यांच्या मोठ्या व्यवसायात उतरले.

Advertisement

नक्की वाचा >>Beed News: गेवराईत विवाहितेनं जीवन संपवलं, सासरच्या घरी रंगला नको तो खेळ, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल

​सोन्याच्या जगात कसं कमावलं नाव?

​राजेश एक्स्पोर्ट्सचे बिझनेस मॉडेल अत्यंत मजबूत मानले जात होते.ही कंपनी कच्चे सोने खरेदी करते,त्यावर प्रक्रिया करून शुद्ध सोन्यात रूपांतरित करते.दागिने बनवते आणि बाजारात विकते.राजेश मेहता यांच्या कारकिर्दीला आणि कंपनीला सर्वात मोठे वळण 2015 मध्ये मिळाले.यावर्षी राजेश एक्स्पोर्ट्सने स्वित्झर्लंडची प्रसिद्ध रिफायनरी 'वॅलकॅम्बी'(Valcambi)चे अधिग्रहण केले.वॅलकॅम्बी ही जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनिंग कंपनी मानली जाते.या ऐतिहासिक करारानंतर राजेश मेहता यांचे नाव जागतिक बाजारपेठेत चमकले होते.

​वार्षिक उत्पन्न आणि सेबीचे गंभीर आरोप

​आकडेवारीनुसार,राजेश एक्स्पोर्ट्सचा वार्षिक महसूल (Revenue) जवळपास 39.2 अब्ज डॉलर्स (अंदाजे 3.75 लाख कोटी रुपये)आहे,तर कंपनी जवळपास 1465 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवते. शेअर बाजारात कंपनीचे मूल्यांकन (Valuation) सुमारे 9829 कोटी रुपये आहे. मात्र,सेबीच्या माहितीनुसार, कंपनीने त्यांची एकूण विक्री पूर्णपणे वाढवून सांगितली आहे.आदेशानुसार,जवळपास 97% ते 99% महसूल बनावट असणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. तसच यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नाही. 

नक्की वाचा >> 8 वेळा तुटलं स्वप्न, पण शेवटी मातृत्व जिंकलं! जुळ्या बाळांच्या जन्मानंतर 45 वर्षांच्या अभिनेत्रीला अश्रू अनावर

​एलआयसीला (LIC) का बसला मोठा फटका?

​राजेश मेहता यांच्यावर झालेल्या या कारवाईचा थेट परिणाम 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'म्हणजेच एलआयसीवर झाला आहे.राजेश एक्स्पोर्ट्समध्ये एलआयसीची 10.8% ची मोठी भागीदारी आहे. सेबीचा हा आदेश समोर येताच एलआयसीच्या शेअर्समध्येही 1 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.तज्ज्ञांच्या मते,महसुलातील या प्रचंड गडबडीच्या आरोपांमुळे राजेश एक्स्पोर्ट्सच्या शेअर्सची किंमत दीर्घकाळासाठी घसरलेली राहू शकते.यामुळे एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.सध्याच्या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी या शेअरपासून पूर्णपणे दूर राहावे,असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.