आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed Married Woman Death News : गेवराई शहरातील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी पती,सासू-सासरे,दीर,जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी व पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.पूजा प्रमोद सुरवसे (20) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.
कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय धाव घेतली अन्..
मिळालेल्या माहितीनुसार,घटनेच्या दिवशी तिचा कुटुंबीयांसोबत संपर्क झाला होता. त्यानंतर सायंकाळी तिच्या वडिलांना मुलीने जीवन संपवल्याचं फोनद्वारे कळवण्यात आलं. कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय धाव घेतली असता पूजा मृत पावल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर मृत महिलेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
नक्की वाचा >>Kalyan News: कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार..ग्राहक बनून रिक्षात बसला अन् नको ते केलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे,सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे,दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ केला.या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Vaibhav Sooryavanshi : भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला जागा मिळणं कठीण,आकाश चोप्राने सांगितली यामागची सर्व कारणे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world