Ratan Tata : रतन टाटा यांची प्रकृती गंभीर? काय आहे सत्य? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना पूर्णविराम 

रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

Ratan Tata Health Update: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Industrialist Ratan Tata Age 86) यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा गेल्या काही तासांपासून सुरू आहे. त्यांचा ब्रीच कँडी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रतन टाटा यांची प्रकृती स्थिर असून नियमित तपासणी करण्यासाठी ते रुग्णालयात गेल्याची माहिती रतन टाटा यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन शेअर करण्यात आली आहे.

रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावरुन गैरसमज पसरवलं जात असल्याचं त्यांनी आपल्या अकाऊंटवरुन म्हटलं आहे. वयानुसार आणि काही वैद्यकीय कारणास्तव नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Ratan Tata Fact check)

मुंबईतील एका पारशी कुटुंबात रतन टाटा यांचा जन्म झाला. जगभरातील मोठा उद्योगसमूह असताना टाटा समूहाने कायम सामाजिक बांधिलकी सांभाळली. स्वांतत्र्योत्तर काळापासून ते आतापर्यंत टाटा कुटुंबाने समाजाच्या उन्नतीसाठी अनेक कामं केलीत. त्यामुळे रतन टाटा यांच्याबाबत लोकांच्या मानत आदर्श स्थान आहे.