गुढीपाडव्याचा दिवस फळांच्या राजाने केला 'गोड', बाजारातून आली Good News

यंदाचा हंगाम आंबा प्रेमींना पर्वणी असू शकते. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवी मुंबईच्या APMC फळं मार्केटमध्ये आंब्याच्या ७० हजार पेट्यांची आवक झाली असून दरांमध्ये घसरण पहायला मिळते आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

आंबा हे फळ कोणाला आवडत नाही असा माणूस अभावानेच सापडेल. उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे आंबे प्रेमींसाठी पर्वणीच मानला जातो. यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबे प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नवी मुंबईच्या AMPC येथील फळमार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर तब्बल 70 हजाराहुन अधिक आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दिवशी राज्यात अनेक घरांमध्ये आंबे खरेदी करुन, दुपारच्या जेवणार आमरस पुरीचा बेत करण्याची प्रथा असते. अनेकजण नैवेद्यासाठीही आंबे खरेदी करतात. त्यामुळे यंदा खवय्यांना आंब्यांवर आडवा हात मारता येतणार आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फळ बाजारात आंब्याच्या पेट्यांची संख्या वाढली असल्यामुळे दरांमध्येही घसरण झालेली पहायला मिळते आहे. हापुस आंब्याचं उत्पादन होणाऱ्या रत्नागिरी-देवगड या भागातून दरदिवशी अंदाजे 60 ते 70 हजार पेट्या नवी मुंबईत येत आहेत. याव्यतिरीक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातल्या स्थानिक आंब्यांच्या 10 ते 15 हजार पेट्याही नवी मुंबईत येत आहेत. 

आवक वाढल्यामुळे दरही घसरले -

मालाची आवक वाढल्यामुळे सध्याच्या घडीला नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये तयार हापूस आंबा हा 600 ते 1200 रुपये डझन च्या दराने विकला जातोय. तसेच हिरवा आंब्याच्या पेटीचा दर सध्या 400 ते 1 हजारच्या दरात आहे.

नवीन वर्षाचा मुहुर्त साधून आंबा बागायतदारांकडून  व्यवसायाची सुरुवात -

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. यावेळी मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात. सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. यंदा कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या वाढली आहे. शिवाय इतर राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर सुद्धा कमी झाल्याने ग्राहकांना मनमुरादपणे आंबा खाता येणार आहे.

Advertisement

अवश्य वाचा - Gudi Padwa: गोडवा पसरवणारे पुण्यातील 'घर', खवय्यांसाठी 20 प्रकारच्या पुरणपोळ्यांची मेजवानी

Topics mentioned in this article