राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Tanvi Redij Wins Gold Medal : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील रहिवासी आणि चिपळूणमधल्या डी.बी.जे कॉलेजची योगपटू तन्वी रेडीजने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गुजरात येथे पार पडलेल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये तन्वीने सुवर्णपदक पटकावलं. 55 हून अधिक देशांच्या सहभाग असलेल्या या स्पर्धेत तन्वीने उत्कृष्ट सादरीकरण करून ही ऐतिहासिक कामगिरी केली.तिच्या या यशामुळे लोटेमाळ आणि चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे 4 ते 8 जून 2026 दरम्यान ही स्पर्धा झाली.
चाचणी स्पर्धेतून गुजरात येथील 'वर्ल्ड चॅम्पियनशीप'साठी निवड
योगपटू तन्वी रेडीज हिची हरियाना येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून गुजरात येथील 'वर्ल्ड चॅम्पियनशीप'साठी निवड झाली होती.या स्पर्धेत 55 पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते.डी.बी.जे.महाविद्यालय,चिपळूण येथे विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीने जगभरातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंमध्ये झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट योगकौशल्य,संतुलन,लवचिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर अव्वल स्थान मिळवले.तिच्या या यशामुळे भारताचा तिरंगा जागतिक मंचावर अभिमानाने फडकला.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' चौकात तुफान हाणामारी, आजीबाई मध्यस्थी करायला गेल्या अन् भलतच घडलं, CCTV Video
तन्वीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं
खेडमधल्या लोटेमाळ गावची रहिवासी असलेली तन्वी ही पाग व्यायामशाळा,चिपळूण येथे प्रशिक्षण घेत असून तिच्या या यशामागे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि परिश्रम लाभले आहेत.त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळेच तन्वीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश संपादन केले आहे. या अभिमानास्पद कामगिरी आधी तन्वीने अनेक पुरस्कार 'योग'या क्रीडा प्रकारात मिळवून पाग व्यायामशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.यामध्ये सन २०२५ मध्ये झालेल्या एशियन योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्ये दोन सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत.