जाहिरात

Trending News : ओमान किनारपट्टीजवळ जहाजावर हल्ला,24 भारतीय खलाशी अडकले, समुद्रातील Video आला समोर

ओमान किनारपट्टीजवळ एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओमानच्या किनारी भागात जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय.

Trending News : ओमान किनारपट्टीजवळ जहाजावर हल्ला,24 भारतीय खलाशी अडकले, समुद्रातील Video आला समोर
Oman Indian Ship Attack Video

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 

Oman Ship Attack News : ओमान किनारपट्टीजवळ एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओमानच्या किनारी भागात जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. ओमानच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर हल्ला झाल्याचं समजते. जहाजावर एकूण 24 भारतीय खलाशी (Seafarers) असल्याचंही सांगितलं जात आहे. हे सर्व खलाशी जहाजावर अडकले होते. जहाजाचे लोकेशन हार्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) परिसरात असल्याची माहिती आहे. @FSUIINDIA नावाच्या एक्स अकाऊंटवर या जहाजाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान,ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या 'मॅरिव्हेक्स' (Marivex) या जहाजावरून अखेर ओमानमधील 'मेरियाह' (Meariah) बेटावर सर्वांना सुरक्षितपणे आणण्यात आले. यातील 24 भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत.

ओमान समुद्र किनाऱ्याजवळील जहाजाचा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, ओमान किनारपट्टीजवळ व्यापाऱ्यांच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याने खुलाशांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय नौदलाला (Indian Navy) मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Pune News : जेजुरी गडावर मोठा राडा! पालखी शेजारी घडला संतापजनक प्रकार, पुजाऱ्यालाही केली मारहाण, Video व्हायरल

जहाजाची स्थिती आणि हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून बचावकार्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com