VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत

Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर एका प्रसिद्ध रील स्टारने मोठा हायड्रॉमा आणि धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

"मी रील स्टार आहे... माझी गाडी टोल नाक्यावर का अडवली?" असा उद्दाम सवाल करत सोशल मीडियावरील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर महेश मोटे याने टोल नाक्यावर चांगलाच धुमाकूळ घातला. पुणे-पंढरपूर महामार्गावरील एका टोल नाक्यावर हा सर्व गोंधळ झाला. आपण सर्वसामान्य नागरिक नसून रील स्टार असल्यामुळे आपल्याला टोलवर थांबवायचे नाही, अशी भाषा वापरत महेश मोटे याने टोल कर्मचाऱ्यांवर आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण राड्यानंतर महेश मोटे याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून टोल न घेताच गाडी सोडल्याचा दावाही त्याने या व्हिडिओमध्ये केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटीझन्समधून त्याच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेटीझन्स संतप्त; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

सोशल मीडियावर काही फॉलोअर्स मिळाल्यानंतर स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजणाऱ्या अशा रील्स स्टार्सवर लगाम कसण्याची गरज आता व्यक्त होत आहे. महामार्गांवर सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन दादागिरी करणाऱ्या या कंटेंट क्रिएटरवर पिंपरी-चिंचवड किंवा स्थानिक पोलीस प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण)

VIDEO

2017 मध्ये थायलंडमध्ये झाली होती अटक

टोल नाक्यावर कायदा हातात घेणाऱ्या आणि व्हीआयपी असल्याचा तोरा मिरवणाऱ्या महेश मोटेचा जुना गुन्हेगारी इतिहासही या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2017 मध्ये महेश मोटे हा थायलंडला गेला असताना बँकॉक विमानतळावर त्याने एका सहप्रवाशाचे पैसे चोरल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर झाला होता.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
 
चोरीच्या गुन्ह्याखाली थायलंड पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. तिथे काही काळ तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर महेश मोटे पुन्हा भारतात परतला. भारतात परत आल्यानंतर त्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आणि विविध विषयांवर रील्स बनवण्यास सुरुवात केली, ज्यातून त्याला प्रसिद्धी मिळाली.

Topics mentioned in this article