आपल्या आवाजाने लोकप्रिय झालेली प्रसिद्ध आरजे (रेडिओ जॉकी) सिमरन हिचा मृत्यू झाला आहे. तिने गुरुग्रामच्या सेक्टर 47 मध्ये आपल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे. रेडिओच्या जगात आरजे सिमरन हिचं मोठं नाव होतं. तिने खासगी रेडिओ चॅनलवर काम करीत लोकांच्या मनात खास जागा तयार केली होती. तिने रेडिओच्या माध्यमातून लोकांशी खूप बोलायची..बऱ्याच गोष्टी या आयुष्याशी संबंधित असायच्या...
नक्की वाचा - Crime News : 24 वर्षांच्या तरुणीनं केलं 6 जणांशी लग्न, 7 व्या चा 'बँड' वाजवण्याची होती तयारी, पण...
आरजे सिमरन सोशल मीडियावरही बरीच सक्रिय होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर सिमरनची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. आरजे सिमरनच्या शेवटच्या पोस्टमध्ये ती पंजाबी भाषेतून बोलताना दिसत आहे. ती म्हणते... तू मला आवडतो पण मी सांगत नाही... सोशल मीडियावर आरजे सिमरनची पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांकडून व्हिडिओवर कमेंट करीत श्रद्धांजली वाहिली जात आहे.
रेडिओव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या जगातदेखील आरजे सिमरन प्रसिद्ध होती. इन्स्टाग्रामवर तिचे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. गेल्या काही काळापासून सिमरन फ्रिलान्स म्हणून काम करीत होती, ती मूळची जम्मूची राहणारी होती.