कल्याणमधील शासकीय वसतीगृहाच्या छताचा भाग कोसळला; वॉर्डनचा डोळा निकामी, डोक्यालाही दुखापत

वॉर्डन रामचंद्र जाधव हे 2007 पासून कंत्राटी पद्धतीवर येथे कार्यरत आहेत. 3000 रुपये अल्प मानधनावर ते सेवा देत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

कल्याणमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहाच्या छताचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या वसतीगृहात कार्यरत असलेला वॉर्डन या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली असून एक डोळा गमावण्याची वेळ आली आहे. यावेळी 23 विद्यार्थी घटनास्थळी होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथे गौरी अर्पांटमेंटमध्ये सामाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह चालवले जाते. या वसतीगृहाच्या छताचा काही भाग रात्री 11.15 च्या सुमारास कोसळला. त्याठिकाणी कार्यरत असलेले वॉर्डन रामचंद्र जाधव यांच्या डोक्यात हा छताचा भाग कोसळल्याने ते जखमी झाले. या अपघातात जाधव यांना डोळा गमावण्याची वेळ आली. त्याचबरोबर त्यांच्या डोक्याला आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली. 

(नक्की वाचा-  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन)

वॉर्डन रामचंद्र जाधव हे 2007 पासून कंत्राटी पद्धतीवर येथे कार्यरत आहेत. 3000 रुपये अल्प मानधनावर ते सेवा देत आहे. 17 वर्षे सेवा देऊनही त्यांना सेवेत कायम केले जात नाही. त्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय न्यायालयाने मार्च 2022 मध्ये दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयापश्चातही सरकारी यंत्रणेकडून निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही.

(नक्की वाचा: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले)

रामचंद्र जाधव हे आत्ता सेवा देत असताना जखमी झाले आहेत. त्यांचा डोळा या घटनेत निकामी झाला आहे. आत्ता तरी सरकारने त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आहे. रामचंद्र जाधव यांना दोन मुले, पत्नी आणि वृद्ध आई आहे. त्यांची जबाबदारी जाधव यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत अपघाताची घटना घडल्यावर त्यांच्या कुटुंबियांचा संभाळणार कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article