जाहिरात

चर्चा तर होणारचं! वानखेडेत सचिन-मेस्सीनं एकमेकांना दिलं 'हे खास गिफ्ट, यात लपलंय 1 सीक्रेट, तुम्ही पाहिलं का?

जेव्हा सचिन तेंडुलकर मेस्सीला वानखेडे मैदानात भेटला, तेव्हा अख्खं स्टेडिअम सचिन अन् मेस्सीच्या घोषणेनं दुमदुमलं. पण एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पाहा व्हायरल व्हिडीओ..

चर्चा तर होणारचं! वानखेडेत सचिन-मेस्सीनं एकमेकांना दिलं 'हे खास गिफ्ट, यात लपलंय 1 सीक्रेट, तुम्ही पाहिलं का?
Lionel Messi Mumbai Event Video
मुंबई:

Sachin Tendulkar And Lionel Messi Video : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. कोलकाता, हैदराबादनंतर मेस्सी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांनी स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शवली.तसच बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रेटिंसह, फूटबॉलपटू, राजकीय नेते आणि क्रिकेटर्सही मेस्सीला चिअर्सअप करण्यासाठी वानखेडेवर पोहोचले होते. पण जेव्हा सचिन तेंडुलकर मेस्सीला मैदानात भेटला, तेव्हा अख्खं स्टेडिअम सचिन अन् मेस्सीच्या घोषणेनं दुमदुमलं.

पण एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं,जेव्हा सचिन आणि मेस्सीने एकमेकांना त्यांच्या 10 नंबरची जर्सी गिफ्ट केली. मेस्सीने सचिनला वर्ल्डकप जिंकलेला फुटबॉल गिफ्ट केला. त्यानंतर सचिननेही त्याची जर्सी देऊन मेस्सीचं जंगी स्वागत केलं. तसच मेस्सी फुटबॉलचा दिग्गज सुनील छेत्रीलाही भेटला. या दरम्यान तो डी पॉल आणि लुईस सुआरेझसह काही मुलांसोबत रोंडो खेळताना दिसला.

सचिन तेंडुलकरने मेस्सीला जर्सी भेट दिली, पण त्यात..

या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकरने टीम इंडियाची जर्सी लिओनेल मेस्सीला भेट दिली. त्यावर सचिनचा ऑटोग्राफ होता. मेस्सी आणि सचिन यांनी एकत्र फोटो काढला.त्यानंतर मेस्सीने सचिन तेंडुलकर यांना एक फुटबॉल भेट दिला. याआधी लिओनेल मेस्सी भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीला भेटला होता. या दोघांना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती.जेव्हा लिओनेल मेस्सी आणि सचिन तेंडुलकर समोरासमोर आले,तेव्हा तो क्षण कोणत्याही क्रीडाप्रेमीसाठी स्वप्न साकार झाल्यासारखाच होता.

 कोलकात्यातून झाली मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात

मेस्सीच्या या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकात्यात झाली.‘सिटी ऑफ जॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकात्यात मेस्सीने शनिवारी त्याच्या पुतळ्याचे उद्घाटन केले.मात्र,त्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला.प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये गोंधळ घातला.

या गोंधळानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही नाराजी व्यक्त केली होती.त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, हैदराबादमधील मेस्सीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.आता दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी मेस्सी दिल्लीला पोहोचणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com