बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरुन हल्ला केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आरोपीलाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.
सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आरोपी आणि ताब्यात घेतलेला आरोपी यात साधर्म्य दिसत आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी तपासात गुप्तता पाळली आहे.
पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात नेले असून, तेथे त्याची चौकशी सुरू आहे. संशयित आरोपी काही वेळापूर्वी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ दिसला होता. मुंबई पोलिसांची काही पथके वसई आणि नालासोपारा येथे तळ ठोकून होती.
पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासून या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सैफ अली खानच्या घरापासून आरोपी पळाला त्या मार्गावरील अनेक सीसीटीव्ही पोलिसांना तपासले. नॅशनल कॉलेजवळ आरोपीने कपडे बदल्याचे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याच तपासानंतर पोलिसांना हे यश मिळालं आहे.