Kareen Kapoor Statement : "हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही", करीना कपूरने जबाबात काय म्हटलं?

सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या आसपास किंवा बाहेरील ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
घटना के समय करीना कपूर अपने दोनों बच्चों तैमूर और जेह के साथ घर पर ही मौजूद थीं.

सैफ अली खानवर झालेल्या हल्याप्रकरणी पोलिसांना करीना कपूर खानचा जबाब नोंदवला आहे.  करीना कूपरने वांद्रे पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की,  सैफ अली खानवर  हल्ला झाला त्यावेळी आरोपी आक्रमक होता . हल्लेखोराने घरातून काही चोरले नाही, दागिने समोर पडले होते. मात्र चोरट्याने त्याला हातही लावला नाही. 

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने सांगितले की, सैफसोबत जेव्हा वाद सुरु असताना आरोपी आक्रमक झाला होता. पण कसेबसे कुटुंबीय त्यातून सुटका करुन 12व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर करीना इतकी अस्वस्थ झाली की तिची बहीण करिश्मा कपूर तिला तिच्या घरी घेऊन गेली.

(नक्की वाचा-  Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक CCTV फुटेज समोर)

करीन कपूरने सांगितलं की, सैफ मधे आल्याने हल्लेखोर जहांगीरपर्यंत पोहोचू शकला नाही. हल्लेखोराने घरातून कोणतीही चोरी केली नसून, त्याचे वागणे अतिशय आक्रमक होते. आरोपीने सैफवर अनेक वेळा हल्ला केला, त्यामुळे मी घाबरले होते, असं करीनाने जबाबात म्हटले आहे. 

आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्ल्याच्या 5 तासांनंतरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी हा हल्ल्या वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर निळ्या शर्टमध्ये दिसत आहे. नवीन व्हिडिओ सुमारे 7 वाजल्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला)

आणखी एका व्हिडीओत व्हिडिओमध्ये हल्लेखोर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांची अनेक पथके हल्लेखोराच्या शोधात रात्रंदिवस काम करत आहेत. संपूर्ण मुंबईतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे.

आरोपी गेला कुठे?

सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या आसपास किंवा बाहेरील ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. पोलिसांना चोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्राचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. दोन दिवस उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सतत वेश बदलून पोलिसांना चकवा देत आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची 35 पथके आरोपीच्या शोधात आहेत.

Advertisement

(नक्की वाचा - Saif Attacked: हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण)

सैफला डिस्चार्ज मिळणार

लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना जनरल वॉर्डात हलवण्यात आले आहे. त्याला 21 जानेवारीला डिस्चार्ज मिळू शकतो असे सांगण्यात येत आहे.