बॉलिवूड सुपर स्टार सलमान खान याच्या घरा बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात (Salman Khan Firing Case) मुंबई क्राईम ब्रांचने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये गँगस्टर अनमोल बिश्नोई आपल्या शुटर बरोबर बोलतानाच्या ऑडिओ क्लिपचाही समावेश आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लॉरेन्सचा भाऊ अनमोल त्याचे शुटर पाल आणि गुप्ता यांना सुचना देत आहे. त्यात तो त्यांना हेल्मेट घालून जावू नका अशा सुचना देत आहे. शिवाय फायरिंग कराल त्यावेळी सिगारेट ओढत राहा असेही सांगत आहे. त्यांना कसलीही भिती नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे त्याने फायरींगच्या एकदीवस आधी सांगितले होते. हेल्मेट घालू नका, फायरिंग करते वेळी सिगारेट ओढा, तुम्ही इतिहास रचणार आहात असे तो त्यांना सांगत आहे. याच शुटर्सनी सलमान खानच्या मुंबईतल्या घरा बाहेर 14 एप्रिलला गोळीबार केला होता.
'गोळीबार असा करा की सलमान घाबरला पाहीजे'
लॉरेन्स बिश्नोईच्या भाऊ अनमोल सर्व सुत्र हलवत होता. जे शुटर्स पाठवले होते त्यांनी काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याच्या सुचना तो फोन वरून देत होता. त्याने शुटर्सना सांगितले की 'तुम्ही गोळीबार विचारपूर्वक करा, गोळीबार घराबाहेर सगळीकडे झाला पाहीजे, त्यासाठी मग अर्धा मिनिट वेळ लागेल किंवा दिड मिनिट वेळ लागेल, त्यासाठी काही अडचण नाही. पण गोळ्या अशा चालवा की भाई ( सलमान ) घाबरून जाईल.' गँगस्टरच्या भावाने अजून सांगितले की
सलमानचा जबाब काय?
या चार्जशीटमध्ये सलमानच्या जबाबही आहे. त्यात त्याने म्हटले आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि त्यांच्या गँगला मला आणि माझ्या कुटुंबाला ठार मारायचे आहे. त्यासाठीच घरा बाहेर फायरींग केली गेली. असे सलमान यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. शिवाय शुटर एकमेकां बरोबर सिग्नल अॅपच्या माध्यमातून बोलत होते त्या ऑडीओ क्लिपचाही समावेश या चार्जशीटमध्ये केला गेला आहे.
शुटर्सना काय दिले होते आदेश?
14 एप्रिलला सलमान खानच्या घरा बाहेर गोळीबार झाला होता. त्यावेळ अनमोल बिश्नोई हा शुटर्सना सिग्नल अॅपच्या माध्यमातून संपर्कात होता. शिवाय तो त्यांना वेगवेगळ्या सुचनाही देत होता. त्यातच त्याने हेल्मेट घालू नका, सिगारेट ओढत राहा, तुम्ही नवा इतिहास निर्माण करणार आहात अशा पद्धतीची वक्तव्य केली होती. सलमान खानच्या घरा बाहेर सागर पाल आणि विक्की गुप्ता हे दोन शुटर्स गेले होते. अनमोल हा त्यांच्या सतत संपर्कात होता. या सर्वबाबी या चार्जशीटमध्ये टाकण्यात आल्या आहेत.
पोलिसांचा दावा काय?
जेव्हा हा सर्व प्रकार सुरू होता त्यावर लॉरेन्स बिश्नोईचेही बारीक लक्ष होते. लॉरेन्स हा गुजरातच्या जेलमध्ये सध्या आहे. ज्यावेळी फायरींग झाली त्यावेळी शुटर्सनी लॉरेन्स बरोबर फोनवरून बोलल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या सर्व गोष्टी पोलिसांनी चार्जशीटमध्ये टाकल्या आहेत.