इंस्टावर मैत्री, नाव बदललं, प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं

पुन्हा पाकिस्तानला जाण्याची ती तयारी करत होती. मात्र त्याची भनक पोलिसांना लागल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. तिची जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.

Advertisement
Read Time: 2 mins
ठाणे:

ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सनम खान उर्फ नगमा या 23 वर्षाच्या विवाहीत तरूणीनं ठाण्यातून थेट पाकिस्तान गाठलं. त्यासाठी तिने खोटी कागदपत्र बनवली. त्याच्या सहाय्याने ती पाकिस्तानात पोहोचलीही. एक महिन्याच्या कालावधीनंतर ती भारतातही परतली. पुन्हा पाकिस्तानला जाण्याची ती तयारी करत होती.  मात्र त्याची भनक पोलिसांना लागल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. तिची जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहे. शिवाय पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सनम खान उर्फ नगमा ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. तिचं वय 23 वर्ष आहे. तिचे लग्न झाले असून तिला दोन मुली आहे. पण ती सध्या नवऱ्यापासून विभक्त रहाते. तिची आई ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये राहते. उत्तर प्रदेशातून ती थेट तिच्या आईकडे ठाण्याला मुलींसह आली. ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होती. त्याच वेळी इन्स्टावरून तिची मैत्री पाकिस्तानातल्या बाबर याच्या बरोबर झाली. ते दोघे जवळपास सहा महिने एकमेकां बरोबर बोलत होते. त्याच्यांत प्रेम निर्माण झाले. बाबरने सनम हिला पाकिस्तानात येण्यासाठी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - पावसात खेळू नकोस,पालकांनी खडसावले, 13 वर्षाच्या मुलीने थेट...

त्याच्या बोलवण्यावरून सनम पाकिस्तानला जाण्यास तयार झाली. तिने कागदपत्रांची जुळवाजुळव  करण्यास सुरूवात केली. त्यासाठी तिने खोटी कागदपत्र तयार केली. तिला एक महिन्याचा व्हिसा ही मिळाला. ती तिच्या दोन मुलींसह पाकिस्तानात पोहोचली. पाकिस्तानातल्या एबॉटाबादमध्ये ती पोहोचली. तिथे तिने लग्नही केले. एक महिना ती बशीर बरोबर राहीली. एक महिन्याचा व्हिसा तिच्याकडे होता. शिवाय तिची आईही आजारी होती. त्यामुळे तिने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. 

ट्रेंडिंग बातमी - ती अल्पवयीन, आधी मैत्री मग प्रेम, गर्भवती राहिली अन् पुढे भयंकर घडलं

 ठाण्याला आपल्या आईकडे ती पाकिस्तानातून परतली. त्यानंतर तिला पुन्हा पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी मात्र ती चौकशी यंत्रणाच्या रडारवर आली. तिला ठाणे पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यानंतर तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करत आहेत. दरम्यान पोलिस व्हेरिफीकेशन वेळी मोठी चुक झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच सनमला व्हिसा मिळू शकला होता. तपास यंत्रणा आत सनम नक्की कशासाठी पाकिस्तानात गेली होती? ती तिथे कोणाला भेटली? भेटलेली व्यक्ती कोण होती? तिथे जावून तिने काय केले? याची चौकशी केली जाणार आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article